शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 मार्च 2016 (13:56 IST)

Movie Review: फॅमिली एंटरटेनर आहे 'कपूर एंड सन्स'

प्रोड्यूसर करण जोहरचे चित्रपट 'कपूर एंड संस' रिलीज झाले आहे. शकुन बत्राच्या निदर्शनात तयार झालेल्या या चित्रपटात आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, फवाद खान आणि ऋषि कपूर मुख्य भूमिकेत आहे. काय आहे चित्रपटाची कथा  ... 
क्रिटिक रेटिंग 3/5
स्टार कास्ट सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट, फवाद खान, ऋषि कपूर, रत्ना पाठक आणि रजत कपूर
डायरेक्टर शकुन बत्रा
प्रोड्यूसर हीरू जौहर, करन जौहर और अपूर्वा मेहता
म्युझिक  डायरेक्टर अमाल मलिक, बादशाह, अर्को, तनिष्क बागची, बेनी दयाल आणि नुक्लेया
जॉनर फॅमिली ड्रामा
 
चित्रपटाची कथा खास करून राहुल कपूर (सिद्धार्थ मल्होत्रा) आणि अर्जुन कपूर (फवाद खान)च्या आजूबाजूस फिरते, जे एक कुटुंबाशी निगडित असतात जिथे सर्व लोक आपसांत भांडण करत राहतात. या फॅमेलीचा 90 वर्षांचा मुखिया अमरजीत कपूर (ऋषि कपूर)ची शेवटची इच्छा एक फॅमेली फोटोची असते, ज्याच्या खाली 'कपूर एंड संस सिंस 1921 लिहिलेले असेल. कथेत बरेच ट्विस्ट येतात. जसे की राहुल आणि अर्जुन एकाच मुलीच्या प्रेमात अर्थात टिया सिंह (आलिया भट्ट)च्या पडतात. जेव्हा दोघांना या गोष्टीची जाणीव होते तेव्हा काय होत आणि अमरजीत कपूर यांची शेवटची इच्छा पूर्ण होते का? असे बरेच प्रश्न आहे, ज्यांचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे चित्रपट बघावे लागेल.
 
कसे आहे शकुन बत्राचे डायरेक्शन...
शकुन बत्राची स्क्रिप्ट उत्तम आहे. त्यांनी कथेच बरेच ट्विस्ट टाकले आहे, जे ऑडियंसला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बांधून ठेवते. एकाच छताखाली राहत असून देखील त्यांच्यातील होणारी खटपटीला शकुनने फारच सुंदररीत्या दाखवले आहे. त्याशिवाय, त्यांनी चित्रपटात रोमँटिक, फनी आणि इमोशनल मोमेंट्सला देखील फार सुंदररीत्या दाखवले आहे.  
 
कसे आहे स्टारकास्टचे परफॉर्मेंस...
आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान आपल्या आपल्या भूमिकेत फिट बसले आहे. तसेच, ऋषी कपूर, रत्ना पाठक आणि   रजत कपूरने देखील आपल्या भूमिकांसोबत न्याय केला आहे. अर्थात ऍक्टींगच्या बेसवर चित्रपटात कुठलीही कमी नाही आहे.  
 
चित्रपटाचे म्युझिक ...
चित्रपटाचे म्युझिक फारच छान आहे. 'कर गई चुल'ने चित्रपटाच्या रिलीज अगोदर टॉप लिस्टमध्ये जागा बनवली आहे. त्याशिवाय 'बोलना', 'बुद्धू सा मन', 'ओ साथी मेरे' आणि 'लेट्स नाचो'देखील ऑडियंसला अट्रैक्ट करत आहे.  
 
चित्रपट बघावे की नाही ...
जर तुम्ही बर्‍याच दिवसांपासून एक चांगल्या फॅमिली ड्रामाची वाट बघत असाल तर 'कपूर एंड संस' तुम्हाला निराश करणार नाही.