1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2015 (12:42 IST)

दिलवाले : चित्रपट समीक्षा

चेन्नई एक्सप्रेस सारखे सुपरहिट चित्रपट देणारे डायरेक्टर रोहित शेट्टी एकदा परत शाहरुख खानसोबत सिल्वर स्क्रीनवर धमाकेदार अंदाजामध्ये प्रेक्षकांसमोर आले आहे. या वेळेस रोहितने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ची स्टार जोडी प्रेक्षकांसमोर आणली आहे. या रोमँटिक जोडीसोबत चित्रपटात वरुण धवन आणि कृती सेनन देखील आहे. जेव्हाकी, सपोर्टिंग रोल्समध्ये वरुण शर्मा, बोमन इराणी, संजय मिश्रा, जॉनी लीवर समेत बरेच स्टार्स आहेत.

चित्रपटाची कथा  
चित्रपटाची सुरुवात शाहरुख खानच्या एंट्री द्वारे होते, जो गोवाचा रिटायर्ड काली डॉनच्या भूमिकेत आहे. काली, असा डॉन आहे जो बुल्गारिया सोडून गोव्यात आला आहे. त्याचे बुल्गारिया सोडण्याचे कारणच संपूर्ण चित्रपटाची कथा आहे. रोहितने सस्पेंसमध्ये काजोलला इंट्रोड्यूस केले आहे, आणि ती शाहरुखच्या प्रेमात पडते. शाहरूख आणि काजोलची क्यूट जोडी वरुण आणि कृतीसोबत रोमांस करताना दिसते. चित्रपटात वरुणने शाहरुखच्या भावाची आणि कृतीने काजोलच्या बहिणीचा रोल केला आहे. चित्रपटात सर्वात मोठे ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा काजोलची भूमिका ग्रे शेड मध्ये येते.  
 
वर्ष 1995मध्ये शाहरुख आणि काजोलची रोमँटिक जोडीने आदित्य चोप्राच्या डायरेक्शनमध्ये सिल्वर स्क्रिनवर जादू केला होता. कदाचित याच उमेदने रोहितने या जोडीला प्रेक्षकांसमोर एकदा परत सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपटाचे नाव 

दिलवाले

क्रिटिक रेटिंग

4

स्टार कास्ट

शाहरुख खान, काजोल, वरुण धवन आणि कृति सेनन

डायरेक्टर

रोहित शेट्टी

प्रोड्यूसर

गौरी खान

म्युझिक डायरेक्टर

प्रीतम

जॉनर

रोमांस, एक्शन, कॉमेडी

कशी आहे अॅक्टिंग
शाहरुख, काजोल, वरुणशिवाय चित्रपटात सपोर्टिंग रोलमध्ये कबीर बेदीने उत्तम अभिनय केले आहे. त्यांनी काजोलच्या वडिलांचे आणि शाहरुखच्या शत्रूची भूमिका साकारली आहे. रोमांसच्या मध्येच संजय मिश्रा, जॉनी लीवर, बोमन इराणी आणि वरुण शर्माची कॉमेडी मनोरंजन करण्यासारखी आहे.   
 
दिलवाले पूर्णपणे टिपीकल रोहित शेट्टीची मूव्ही म्हणू शकतो. यात इंटरटेनमेंटचा भरपूर मसाला आहे. अर्थात रोमांस, कॉमेडी, अॅक्शन, ड्रामा, डांसची भरमार आहे. या चित्रपटात देखील रोहितने आपल्या अॅक्शन कार सिग्नेचर स्टाइलला कायम ठेवले आहे. पण यंदा तुम्हाला महागड्या आणि लग्झरी मोटार गाड्या बघायला मिळणार आहे.  
 
म्युझिक  
चित्रपटात रोमँटिक जोडी आहे तर गाणेपण असतीलच. चित्रपटाचे गाणे चार्टमध्ये टॉपवर आहे. खास करून रंग दे तू मोहे गेरूआ आणि   टूकूर-टूकूर फार पसंत करण्यात येत आहे.  
 
चित्रपट बघावे की नाही  
एकूण, दिलवालेबद्दल तीन शब्दात सांगायचे तर - एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट और एंटरटेनमेंट. उत्तम एडिटिंगमुळे चित्रपट चुस्त आणि  फास्ट आहे. हे रोहितच्या डायरेक्शनचे कमाल आहे की चित्रपट बघताना तुम्हाला बोर होण्याचा मोका मिळणार नाही.