शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: शनिवार, 25 ऑक्टोबर 2014 (12:52 IST)

‘हॅप्पी न्यू ईयर’ : चित्रपट समीक्षा

चित्रपटाची कथा सुरु होते ती चंद्रमोहन शर्मा उर्फ चार्ली (शाहरुख खान) या पात्रापासून ज्याचे वडिल मनोहर शर्मा (अनुपम खेर) डायमंड मार्केटचे सिक्यूरिटी हेड असतात. त्यांच्याकडून चरण ग्रोवर (जॅकी श्रॉफ) त्याच्या १०० कोटींच्या हि-यांसाठी एक लॉकरचे डिझाइन बनवून घेतो आणि त्यानंतर त्याची चोरीदेखील स्वत:च करतो. यानंतर मनोहर शर्माला तुरूंगात टाकले जाते. चोरी करुन चरण ग्रोवर हे हिरे दुबईतील शालीमार हॉटेलमधील एका तिजोरीमध्ये लपवून ठेवतो. आपल्या वडिलां तुरूंगात जावे लागण्याचा बदला घेण्यासाठी चार्ली १०० कोटींचे हिरे चोरी करण्याची योजना आखतो. ही चोरी यशस्वी करन्यासाठी चार्लीचा मित्र जगमोहन उर्फ जॅक (सोनू सूद) आणि टॅमी (बोमन ईरानी) हे त्याची मदत करतात.
 
जॅग आणि टॅमी या दोघांनी चार्लीच्या वडिलांसोबत काम केलेले असते. या योजनेमध्ये चार्ली त्याच्या टीममध्ये आणखी दोन मित्रांना म्हणजे रोहन सिंह (विवान शाह) आणि नंदू भिडे (अभिषेक बच्चन) यांना सामिल करून घेतो. नंदू, चरण ग्रोवरच्या मुलगा विक्कीसारखाच दिसणारा आहे. ही चोरी करण्यात आलेल्या प्लाननुसार सर्व टीम शालीमार हॉटेलमध्ये शिरकाव करण्यासाठी ‘वर्ल्ड डांस चैंपियनशिप’ मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेते. पण, या टीममधील एकालाही डान्सची एबसीदेखील येत नसते. त्यामुळे नंदू एका बार डान्सर मोहनी (दीपिका पादुकोण)चे नाव सगळ्यांना डान्स शिकवण्यासाठी सुचवतो चार्लीच्या इंग्लिशवर इम्प्रेस होऊन मोहनी सगळ्यांना डान्स शिकवण्यास तयार होते. यानंतर सगळेजण दुबईला पोहोचतात आणि इथून सुरू होतो हिरे चोरण्याचा आणि डान्स चैंपियनशिपचा खेळ. तुम्हाला हे तर माहितीच आहे की, हिरोच हिरे चोरतो. पण, या चोरीचा देसी अंदाज नेमका कसा आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जावेच लागेल.
 
या चित्रपटामध्ये एक नाही तर अनेक प्रसिद्ध कलाकारांनी अभिनय केले आहेत. या चित्रपटामध्ये शाहरुखच्या अभिनयावर कोणताच प्रश्न उपस्थित होत नाही. पण अशाच प्रकारच्या अभिनयामध्ये शाहरूख खान कमीत कमी ८ चित्रपटांमध्ये दिसला आहे. दीपिकाच्या अभिनयामध्येदेखील काहीच नाविण्य बघण्यास मिळत नाही. दीपिकाचे या चित्रपटातील डायलॉग तुम्हाला ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाची आठवण करून देतील. बोमन ईरानी, अभिषेक बच्चन, सोनू सूद आणि विवान शाह यांनी त्यांची भुमिका योग्य पद्धतीने निभावली आहे.
 
चित्रपटाला विशाल-शेखरने संगीत दिले आहे. या आधी या जोडीने ‘ओम शांति ओम’ या चित्रपटाला संगीत दिले होते. ‘हॅप्पी न्यू ईयर’ या चित्रपटातील गाणे चित्रपटात प्रदर्शित होण्याआधी सुपर हिट झाले आहेत. या चित्रपटाची सगळी गाणी जसे ‘इंडियावाले’, ‘मनवा लागे’, ‘लवली’, ‘सटकली’ ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. चित्रपटाच्या शेवटी आत्तापासूनच स्टार झालेला शाहरूखच्या मुलाचे म्हणजेचे अबरामची झलक तुम्हाला बघण्यास मिळेल हा एक चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे.