हॅपी बर्थ डे अक्षय.. (स्लाईड-शो)
अक्षयचे पाच हिट चित्रपट
9
सप्टेंबर 1967 मध्ये जन्मलेल्या अक्षय कुमार आज आपल्या वयाची 41 वर्षे पूर्ण करत आहे. 18 वर्षाच्या करियरमध्ये अक्षयचे अनेक चित्रपट हिट झाले. ज्या भूमिकांमुळे तो गाजला, त्या चित्रपटांपैकी पाच हिट चित्रपटांवर आपण नजर फिरवूया..... खिलाडी (1992) अक्षय कुमारचा हा पहिला हिट चित्रपट होता. 16 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटामुळेच अक्षयला आजदेखील खिलाडी कुमार म्हटले जाते. या चित्रपटानंतर त्याचे सबसे बडा खिलाडी, मैं खिलाडी तू अनाडी, इंटरनेशनल खिलाडी आदी चित्रपट प्रदर्शित होऊन हिट झाले. अक्षय कुमार, दीपक तिजोरी आणि आयशा जुल्का सारख्या कलाकारांना घेऊन दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी ऍक्शन, सस्पेंस आणि थ्रिलरचा मेळ घालून अशी निर्मिती केली की प्रेक्षक थक्क झाले. यानंतर अक्षयने मागे वळून पाहिलेच नाही.
खिलाडि़यों का खिलाड़ी (1996) या चित्रपटामध्ये अक्षयचे नाव अक्षय मल्होत्रा असे होते. त्यातील ‘ना हम अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हिरो के बच्चे, हम हैं सीधे-सादे अक्षय’ या गीताने तर अक्षयची वेगळी अोळख निर्माण झाली. ‘खिलाडि़यों का खिलाड़ी’ या मध्ये केवळ मालमसाला होता. उत्कृष्ट लोकेशन, गाणी आणि केवळ स्टायलिश ऍक्शनने अक्षयने धम्माल उडवून दिली. रेखा आणि रवीनासारख्या नायिकांबरोबर रोमांस करीत अक्षयने आपल्या वेगळ्या स्टाइलने प्रेक्षकांची मने जिंकली.