testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ऑस्ट्रेलियात शिकायचंय?

वेबदुनिया|
आपल्या देशात परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी सारेच देश प्रयत्नशील आहेत. यात अमेरिका, भारत, ब्रिटन, जर्मनी आदी देशांचा समावेश आहे. आता ऑस्ट्रेलियानेही परदेशी विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यास सुरुवात केली असून, यासाठी भारतातही तेथील काही संस्था, विद्यापीठे आपल्या जाहिराती करत आहेत.

अमेरिकेच्या मानाने ऑस्ट्रेलियात भारतीयांसाठी अत्यंत कमी आणि सुलभ दरात शिक्षण उपलब्ध आहे. फक्त त्यासाठी प्रवेश परीक्षेचा चक्रव्यूह भेदावा लागतो. विविध विद्यापीठांमार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत तुम्ही उनुत्तीर्ण झालात तर तुम्हाला प्रवेश मिळणे अशक्य आहे. येथील विविध विद्यापीठे आणि संस्थांमध्ये प्रवेश पूर्व परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
इंग्रजी अत्यावश्यक
ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी तुम्हाला इंग्रजी येणे गरजेचे आहे. तुमची प्राथमिक भाषा इंग्रजी असावी किंवा तुमचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असावे किंवा तुमची या भाषेवरती चांगली पकड असणे गरजेचे आहे.

आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या आयईएलटीएम अर्थात इंटरनॅशनल लँग्वेज टेस्टिंग सिस्टिम अंतर्गत तुम्हाला या परीक्षेत किमान 6 पर्यंत तरी गुण मिळवणे गरजेचे आहे. टेफ या परीक्षेचेही हेच मापदंड आहेत. ब्रिटिश काउंसिलद्वारे ही परीक्षा घेतली जाते. टी. ओ. ई. एफ्. एल. (अमेरिकन टेस्ट ऑफ इंग्लिश एज ए फॉरेन लँग्वेज) साठीही हेच नियम लागू आहेत. व्हिजा कार्यालयानेही इंग्रजी भाषेसंदर्भात अशीच परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही आधुनिक शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. परंतु अमेरिकेच्या मानाने येथे शिक्षण कमी खर्चिक आहे. तसेच येथील शिक्षणाचा दर्जाही चांगला आहे. ऑस्ट्रेलियात शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे.

या क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेऊ शकता: हयूमॅनिटीज - इंग्लिश, फिलॉसॉफी, हिस्ट्री, इथनिक स्टडीज, फॉरेन लँग्वेज स्टडीज, रिलीजियस स्टडीज, कम्युनिकेशन, वूमेंस स्टडीज.

शिक्षण (एज्युकेशन) - एज्युकेशन स्टडीज, टीचिंग.
समाजशास्त्र (सोशल स्टडीज) - ज्यॉग्राफी लाइब्रेरी एड आर्काइवल स्टडीज, बिहेवियोरल स्टडीज, वेलफेयर एड काउंसलिंग, स्पोर्ट एड रीक्रिएशन, योविटिकल साइंस, सोशियोलॉजी.
- गणित आणि कंप्युटिंग - मॅथेमेटिक्स एड स्टॅटिस्टिक्स, कॉम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सायंस, कॉम्प्युटर सायंस.
- सायंस - बायॉलॉजिकल सायंसेस, फिजिक्स अर्थ सायंसेस, फार्माकॉलोजी वेटेनरी सायंस, एनिमल हसबेंड्री, केमिस्ट्री.
- व्ह्यिज्युअल एड परफॉमिंग आर्ट्स - आर्ट, ग्राफिक आर्ट्स, फॅशन डिझाइन, क्राफ्टस, परफॉर्मिंग आर्ट्स, म्युझिक. - इंजिनियरिंग - केमिकल, सिविल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, स्ट्रक्चरल, मॅकेनिकल, ऑटोमोटिव, एयरोनॉटिकल, माइनिंग,
इंडस्ट्रियल, जनरल इंजिनियरिंग, कॉम्प्युटर इंजिनियरिंग, टेलीकम्यूनिकेशंस. बिझनेस एडमिनिस्ट्रेशन अँड लॉ - इकॉनॉमिक्स, एकाउंटिंग, कॉमर्स, मॅनेजमेंट, एडमिनिस्ट्रेशन, सेक्रेटियल स्टडीज, सेक्स एड

सर्विसेज, लॉ जस्टिस, लीगल स्टडीज. हेल्थ अँड सायंसेस - मेडिक्स एड थेराप्यूटिक टेक्नोलॉजी, नर्सिंग, न्यूट्रीशन, मेडिकल सायंस, इनवायरमेंटल हेल्थ, ऑप्टोमेट्री,

पर्सनल एड फॅमिली हेल्थ केयर.
एग्रीकल्चर - एग्रीकल्चर, फॉरेस्ट्री पार्क्स एड वाइल्ड लाइफ.

व्यावसायिक अभ्यासक्रम टेक्नीकल अँड फर्दर एज्युकेशन (टेफ) सह खासजी ट्रेनिंग संस्थांद्वारा हा अभ्यासक्रम घेतला जातो. यात सरकारच्या नियंत्रणाखाली टेफची परीक्षा घेतली जाते. यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

निवास व्यवस्था
परदेशी विद्यार्थ्यांसाठी ऑस्ट्रेलियात रहाण्याच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. यात कॉलेजचे हॉस्टेल, हॉल ऑफ रेसींडन्स, कॅपस हाऊसिंग, किंवा मग तुम्ही पेईंग गेस्ट म्हणूनही राहू शकता. समाधानाची बाब म्हणजे अमेरिकेप्रमाणे इथे विद्यार्थ्यांवर अधिक बंधनं नाहीत. इथे तुम्ही पार्ट टाइम जॉबही करू शकता. आठवड्याला 20 तास असा याचा कालावधी आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
ऑस्ट्रेलियन एज्युकेशन सेंटर, ऑस्ट्रेलियन हाय कमिशन, 1/50, जी, शांती पथ, चाणक्यपुरी, नवी दिल्ली -21, फोन-
6888223, एक्स्टेन्शन- 408


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

प्रत्येक आजारांवर सोपे उपाय

national news
कैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...

रोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज

national news
भरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...

पनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो

national news
दररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...

काय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत

national news
लहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...

फेशियल करताना घेण्यात येणारी काळजी

national news
व्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...