Widgets Magazine
Widgets Magazine

कॅलिफोर्नियाच्या शाळेत योगप्रशिक्षणाला मंजुरी

yog
वेबदुनिया|
WD
योगप्रशिक्षणाद्वारे हिंदू धर्माच्या संकल्पनांचा पुरस्कार केल्याचा आरोप करणार्‍या पालकांची याचिका फेटाळून लावत अमेरिकेतील न्यायालयाने दक्षिण कॅलिफोर्निया येथील शाळेत शाले अभसक्रमाचा एक भाग म्हणून योग प्रशिक्षणाला मंजुरी दिली आहे. योगप्रशिक्षणामुळे कोणत्याही धर्माचा प्रसार होत नाही, असे सॅन दिएगो येथील न्यायालयातील न्यायाधीशांनी सांगितले. योगशास्त्रातील ‘अष्टांगयोग’ या प्रकाराद्वारे हिंदू धर्मातील संकल्पनांचा प्रचार केला जात असल्याचा आरोप एन्सिनिटास युनिन डिस्ट्रिक्ट स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला होता.

या शाळेमध्ये श्वसन आणि ताण देणार्‍या व्यायामांद्वारे विद्यार्थ्यांना सतत ताजेतवाने ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी 30 मिनिटांचा अभसक्रम आयोजित केला जात होता. अष्टांगयोगाचा प्रसार करणार्‍या संस्थेकडून त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला होता. त्यामुळेच या योगप्रशिक्षणाला पालकांनी आक्षेप घेतला होता. मात्र या प्रशिक्षणामध्ये आसनांच्या प्रकाराचेही इंग्रजी भाषांतर करण्यात आले होते. तसेच संस्कृत शब्दांचा वापरही टाळण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. तरीदेखील पालकांच्यावतीने काम पाहणार्‍या डीन ब्राईल्स यांनी या विरोधात वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.
हे प्रकरण योगशास्त्रामुळे आरोग्याचे फायदे मिळतात की नाही आणि कोणी योगशास्त्राचा सराव करावा की करू ने याबाबत नाही, असे तंनी म्हटले आहे. सरकारी शाळांमधून एखाद्या धार्मिक संस्थेकडून दिले जाणारे प्रशिक्षण योग्य आहे की नाही आणि विशिष्ट धर्माच्या परंपरा आणि विचारसरणी प्रसारित करणे योग्य आहे की नाही याबाबतचा हा खटला आहे, असे ब्राइल्स यांनी स्पष्ट केले आहे.


यावर अधिक वाचा :