testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

न्यूझीलंडमध्ये शिक्षण!

study in newzelend
वेबदुनिया|
ND
न्यूझीलंडचे शैक्षणिक विश्व हे साधारणत: युनिव्हर्सिटी, कॉलेज ऑफ एज्युकेशन, पॉलिटेक्निक आणि खासगी शिक्षण संस्था या प्रकारात मोडणारं. मुख्यत: शैक्षणिक वर्ष मार्चमध्ये सुरू होत असतं.
डिग्री साधारणत: तीन र्वष आणि मास्टर्स साधरणत: दोन र्वष. पॉलिटेक्निक्समध्ये आपण पहिली दोन वर्षे पूर्ण करून तिसऱ्या वर्षाकरिता विद्यापीठात प्रवेश घेऊ शकता. प्रत्येक विद्यापीठ आणि संस्थांची स्वत:च्या प्रवेश पात्रता असून, इंग्रजी विषयात प्रश्नवीण्य अर्थात IELTS/TOEFL ची आवश्यकता बहुतांश संस्थांची प्रमुख अट आहे.
परदेशी विद्यार्थी म्हणून आपल्याला न्यूझीलंडमध्ये जाण्याकरिता व्हिसाची आवश्यकता असून, त्याकरिता खालील बाबींची पूर्तता आवश्यक आहे.
१) प्रवेशासंबधीचे संबंधित संस्थेचे पत्र
२) रिसिष्ट ऑफ फीज किंवा स्कॉलरशिप
३) व्हिसा अ‍ॅप्लिकेशन
४) राहण्याच्या संदर्भातील कागदपत्रे५) पासपोर्ट
६) साधरणत: एक वर्षापर्यंतच्या राहण्या-खाण्याच्या खर्चासंबंधीचे बँकेचे पुरावे.
७) इतर बँक स्टेटमेंट व आवश्यक फायनान्स फ्रूफ आपला कोर्स जर २४ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचा असेल तर.
१) न्यूझीलंड इमिग्रेशन सव्‍‌र्हिसचे मेडिकल आणि चेस्ट एक्स-रे रिपोर्ट.
२) कॅरेक्टर सर्टिफिकेट.
जर आपणास वरील कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर न्यूझीलंडचा व्हिसा प्रश्नप्त झाला तर नक्कीच आपण शिकायला म्हणून न्यूझीलंडला जाऊ शकता, मात्र विद्यार्थी म्हणून. जर आपल्याकडे काम करण्याची परमिशन असेल तरच आपण पार्ट-टाइम वर्क करू शकतो. जर आपल्या कोर्सची आवश्यकता असेल तर न्यूझीलंड इमिग्रेशन सव्‍‌र्हिसकडून तशी परवानगी मिळू शकते. मात्र हे सगळं परिस्थितीजन्य असून, जर प्रश्नप्त परिस्थितीत स्थानिक उमेदवार उपलब्ध नसतील तर आपल्याला काम करण्याची संधी मिळू शकते.
परदेशी विद्यार्थी म्हणून आपला अभ्यासक्रम जर दोन वर्षापेक्षा अधिक लांबीचा असेल तर आपल्याला न्यूझीलंड सरकारतर्फे ‘हेल्थ - बेनिफिट’ मिळू शकतात. मात्र ज्यांचा अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षापेक्षा कमी असेल अशांनी मेडिकल पॉलिसी घेऊन गेलेलेच बरे.

न्यूझीलंड सरकारतर्फे घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांकरिता ‘फायनाशियल एड’ किंवा स्कॉलरशिपचे प्रयोजन असून, विद्यार्थी त्याचाही लाभ घेऊ शकतात. न्यूझीलंडमध्ये मुख्यत: पाच विद्यापीठे असून, बरीचशी पॉलिटेक्निक्स आणि काही खासजी संस्थासुद्धा आहेत. विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ऑकलंड, मॅसे युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ कॅन्टेबरी, व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी ऑफ वेलिंग्टन आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हायकाटो इत्यादींचा समावेश होतो. तेव्हा आपण जर आपल्या पुढील करिअरकरिता न्यूझीलंडची निवड केली असाल तर उपरोक्त माहितीचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल.
- प्रशांत ओचावार


यावर अधिक वाचा :

कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी

national news
केरळमधील महत्वपूर्ण असलेल्या कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट होऊन पाच ठार झाले असून 15 जण ...

धर्मा पाटील कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला

national news
मंत्रालय विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या ...

चार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये

national news
फ्लोरिडा- लहान मुले आपली आवडती खेळणी मिळवण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. फ्लोरिडाच्या ...

भावनाप्रधान होऊ नका, राजकीय भेटीगाठी थांबवा : भुजबळ

national news
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना मुंबई ...

शेतकरी कर्जमाफीच्या कामासाठी आजही बँका सुरु

national news
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या ...