testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

परदेशी विद्यापीठाची ओढ असल्यास काळजी बाळगा

degree
Last Modified सोमवार, 20 एप्रिल 2015 (14:24 IST)
देशभरात सध्या परदेशी विद्यापीठांकडून अनेक प्रकारच्या पदव्या एक ते दोन वर्षात देण्याचं आमिष दाखविलं जात आहे. या जाहिरातबाजीला अनेक विद्यार्थी बळी पडत आहेत. मात्र या विद्यापीठांच्या पदव्या मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणासाठी अमान्य असल्यानं अनेक विद्यार्थ्यांना पदवी घेऊनही पुढील शिक्षण घेता येत नाही.
एका परदेशी युनिव्हर्सिटीमध्ये बारावी झालेल्या विद्यार्थिनीनं हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तिला एमबीए करायचं असल्यानं तिनं यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून पदवी घेतली. तिनं पदविका शिक्षण पूर्ण झालं असल्यामुळं तिला मुक्त विद्यापीठाच्या नियमांनुसार पदवीच्या शेवटच्या वर्षात प्रवेश मिळाला. या पदवीच्या आधारे तिनं मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्थेत पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला.

यासाठी तिनं हातची नोकरी सोडून प्रवेश घेतला, मात्र सहा महिन्यांचं शिक्षण घेतल्यानंतर तिची पदवी ग्राह्य नसल्याचं विद्यापीठानं सांगितल्यानं तिला नोकरी आणि शिक्षणही गमावण्याची वेळ आली होती. मात्र तिचं नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाच्या तक्रार निवारण विभागाकडून प्रयत्न केले जात असल्याचं सांगितलं जातंय.

मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी तीन वर्षाची पदवी घेणं अनिवार्य आहे. मात्र अनेक परदेशी विद्यापीठं दीड-दोन वर्षातच पदवी देत असल्यामुळं ही पदवी नियमानुसार पदव्युत्तरासाठी ग्राह्य धरली जात नाही.


यावर अधिक वाचा :

यूएईत ४८ तासांपर्यंत थांबण्यासाठी व्हिजाची गरज नाही

national news
यूएई सरकारनं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जगातील कुठल्याही कोपऱ्यात प्रवास करताना या ...

अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचा सेल गिळला

national news
पुण्यातील आळंदी येथे अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचा सेल गिळला आहे. हुजैफ तांबोळी असे या ...

रायगड विषबाधा प्रकरण: सावळ्या रंगामुळे त्रस्त महिलेने ...

national news
रायगड जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या महड विषबाधा प्रकरणाच्या पोलीस तपासाला अखेर यश आले आहे. ...

धक्कादायक! दुधी भोपळ्याचा रस प्याल्याने शरीरात विष पसरलं, ...

national news
आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून लोकं अनेक फळ व भाज्यांच्या रसाचे सेवन करतात. मात्र दुधी भोपळा ...

नेटवर्क नसले तरी वायफायने कॉल करता येणार !

national news
मोबाईल नेटवर्क अचानक गायब झाल्यानंतर कॉल करण्याची मोठी अडचण होते. आता वायफाय आपली ही ...