मैत्रीचा नवा प्लॅटफॉर्म
गौतम बेस्ट स्टुडंट म्हणून ओळखला जातो. अभ्यासातच नव्हे तर तो खेळातही तरबेज आहे. करंट अफेअर्सबाबत प्रश्नांचे उत्तर त्याला मुखपाठ असतात. या सर्वांचे श्रेय तो इंटरनेटच्या माध्यमातून बनलेल्या मित्रांद्वारे दिल्या गेलेल्या माहितीला मानतो. तो म्हणतो, अमेरिका, युरोपमध्येही त्याचे मित्र आहेत जे इंटरनेटच्या माध्यमातून जुळले आहेत. नेटवर मित्रांशी क्लासमधील गप्पा, खेळापासून तर करंट अफेअर्स चर्चा तो करतो. पण गौतम सध्या एका संकटात फसला आहे. एका ई-फ्रेंडने चॅटिंगदरम्यान गौतमला काही चुकीच्या गोष्टी सांगणे सुरू केले ज्यामुळे काही चुकीच्या सवयींच्या जाळ्यात फसला. त्याला केलेल्या चुकीची जाणीव झालेली असून त्याने स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे म्हणजेच ई-फ्रेंडशिपमध्ये काही गोष्टी चांगल्या तर काही वाईटही आहेत म्हणून याचा वापर दक्षतापूर्वक केला गेला पाहिजे.
पुढे पहा ई-फ्रेंडशिप....
ई-फ्रेंडशिप
ई-फ्रेंडशिप सोशल नेटवर्किंग साईट्सद्वारे केली जाते. टेक्निकल वर्डसमध्ये सांगायचे झाल्यास हे एक असे सॉफ्टवेअर आहे ते जगभरातील कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी मैत्री करायला मदत करते. म्हणजेच इंटरनेटवर सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून आपण जगातील कुठल्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीशी चॅटिंग, व्हिडिओ कॉंफरन्सिंग किंवा मेलच्या माध्यमातून मैत्री करू शकतो. पुढे पहा सोशल नेटवर्किंग सर्व्हिस....
सोशल नेटवर्किंग सर्व्हिस
सोशल नेटवर्किंगच्या अनेक साईट्स आहेत यात प्रमुख फेस बुक, लिंकेडीन, ऑर्कूट इत्यादी. फेस बुक, लिंकेडिनपेक्षा ऑर्कूट भारतीय विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. भारत असा दुसरा देश आहे जेथे ऑर्कूट साईट सर्वात जास्त क्लिक केली जाते. यातील कुठल्याही साईटवर तुम्ही आपले अकाउंट ओपन करू शकता आणि जगभरात कुठेही मित्र बनवू शकता.
पुढे पहा कसे बनवाल ई- फ्रेंड्स....
कसे बनवाल ई-फ़्रेंड्स