गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (12:47 IST)

अनंत चतुर्दशी 2020 : गणेश विसर्जनाशिवाय भगवान अनंताची उपासना करण्याचा दिवस जाणून घेऊ या थोडक्यात माहिती..

अनिरुद्ध जोशी
वर्षभरात 24 चतुर्दशी असतात. मुळात तीन चतुर्दशीचे महत्त्व आहे- अनंत, नरक आणि बैकुंठ. अनंत चतुर्दशी भाद्रपदाच्या शुक्ल पक्षात येते. 'डोल ग्यारस किंवा 'डोल एकादशीच्या नंतर भाद्रपदात येणारी चतुर्दशी अनंत चतुर्दशी असते. त्यानंतर पौर्णिमा येते.
 
विष्णूची पूजा : पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान अनंताची (विष्णूची) पूजा करण्याचे नियम आहे. या दिवशी अनंताचे सूत्र बांधण्याचे विशेष महत्त्व आहे. या व्रतामध्ये भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केल्या नंतर अनंत सूत्र हातावर बांधले जाते. भगवान विष्णू यांचे सेवक भगवान शेषनागाचे नावच अनंत आहे. अग्नी पुराणात अनंत चतुर्दशीच्या उपवासाचे वर्णन केले आहे.
 
श्रीकृष्णाने याचे महत्त्व सांगितले असे : भगवान श्रीकृष्णाने कौरवांकडून झालेल्या द्यूत क्रीडेत झालेल्या पराभवानंतर सर्व काही गमावून बसलेल्या पांडवाने सर्व काही परत कसे मिळवता येईल आणि या त्रासाचे निराकरण करण्यासाठीचा काही उपाय असल्यास सांगावा. असे विचारल्यावर श्रीकृष्णांनी त्यांना परिवारासह अनंत चतुर्दशीच्या उपवासाबद्दल सांगितले.
 
ते म्हणाले की चातुर्मासात भगवान विष्णू हे शेषनागाच्या शैयेवर अनंत शयन अवस्थेत राहतात. अनंत भगवानांनीच वामन अवतारात दोन पावलात तिन्ही लोकं मापली. त्यांचा आरंभ किंवा शेवट माहीत नसल्यामुळे त्यांना अनंत म्हटले जाते, म्हणून यांचा पूजनानेच आपले सर्व त्रास संपतील.  
 
पूजा कशी करावी: सकाळी लवकर अंघोळ करून उपवासाचे संकल्प घेऊन पूजास्थळी कलश स्थापित करतात. कळशावर अष्टदल कमळ सारख्या भांड्यात कुशाने बनवलेल्या अनंताची स्थापना केल्यावर एका दोऱ्याला कुंकू, केसर आणि हळदीने रंगवून अनंत सूत्र तयार करावं, या सूत्रामध्ये 14 गाठी असाव्यात. याला भगवान श्रीविष्णूच्या फोटोसमोर ठेवून भगवान विष्णू आणि अनंत सूत्राची षोडशोपचाराने पूजा करावी आणि खालील दिलेल्या मंत्राचे जप करावं. त्यानंतर विधिवत पूजा केल्यावर अनंत सूत्राला हातात बांधून घ्यावे. पुरुषांनी उजव्या हातात तर बायकांनी डाव्या हातात हे बांधावे.
 
अनंत संसार महासुमद्रे मग्रं समभ्युद्धर वासुदेव।
अनंतरूपे विनियोजयस्व ह्रानंतसूत्राय नमो नमस्ते।।
 
असे मानले जाते की या दिवशी उपवास करून जो कोणी विष्णुसहस्त्रनाम स्रोताचे पठण करतो, तर त्याचा सर्व मनोकामना पूर्ण होतात. धन धान्य, सुख- संपदा आणि अपत्य प्राप्तीच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत करतात.
 
गणेश मूर्तीचे विसर्जन : अनंत चतुर्दशी च्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता केली जाते. या दिवशी गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करतात. यंदा ही तिथी 1 सप्टेंबर 2020ला येत आहे. गणेश चतुर्थी ते चतुर्दशी पर्यंत 10 दिवसापर्यंत गणेशाची पूजा करतात आणि 11व्या दिवशी पूर्ण विधी-विधानाने गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते.
 
चतुर्दशी तिथी : शंकर हे चतुर्दशीचे देव आहे. या तिथीमध्ये भगवान शंकराची पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तीला सर्व ऐश्वर्याची प्राप्ती होऊन बहुपुत्रांची प्राप्ती तसेच धनसंपन्न होते. ही उग्र म्हणजे आक्रमक तिथी आहे. चतुर्दशीला चौदस देखील म्हणतात. ही तिथी रिक्ता संज्ञक आहे आणि याला क्रूरा देखील म्हटले आहे. म्हणून यामध्ये सर्व शुभकार्य करण्यास मनाई आहे. दिशा याची पश्चिम आहे. ही चंद्रमा ग्रहाची जन्म तिथी देखील आहे. चतुर्दशी तिथीला मुळात शिवरात्र असते. ज्याला मासिक शिवरात्र म्हणून ओळखले जाते.
 
मान्यतेनुसार भगवान शिवाचे उपवास आणि पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आयुष्यात येणाऱ्या वाईट काळाला आणि सर्व संकटांना हे दूर करतं.