शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By

बघा कोणता गणपती करेल आपल्या मनाची इच्छा पूर्ण

1*संतान गणपती- संतान प्राप्तीसाठी विशिष्ट मंत्रासह संतान गणपतीची मूर्ती दारावर लावली.
2* विघ्नहर्ता गणपती- घरात सतत कलह, विघ्न, अशांती, क्लेश, ताण, मानसिक संताप जाणवत असेल तर घराच्या प्रवेश दारावर विघ्नहर्ता गणपतीची मूर्ती स्थापित केली पाहिजे.
3* विद्या प्रदायक गणपती- मुलांचे अभ्यास मन रमावे म्हणून गृहस्वामीने विद्या प्रदायक गणपती आपल्या घराच्या प्रवेश दारावर स्थापित करावे.
4* विवाह विनायक- गणपतीच्या या स्वरूपाचे आव्हान त्या घरामध्ये विधिपूर्वक केलं जातं ज्या घरात मुलांचे विवाह ठरायला अडथळे येतात.
5* चिंतानाशक गणपती- ज्या घरात ताण व काळजीचे वातावरण असतं अशा घरात चिंतानाशक गणपतीची मूर्ती 'चिंतामणी चर्वणलालसाय नम:' असे मंत्र म्हणत स्थापित करायला हवी.
6* धनदायक गणपती- घरात आर्थिक भरभराटीसाठी गणपतीचे या स्वरूपात आराधना करावी. याने दारिद्र्याचा नाश होतो आणि समृद्धी नांदते.
7* सिद्धिनायक गणपती- कार्यात यश व साधनापुरती यासाठी सिद्धिनायक गणपती घरी आणावे.
8* सुपारी गणपती- आध्यात्मिक ज्ञानार्जन हेतू सुपारी गणपतीची आराधना करावी.
9* शत्रुहंता गणपती- शत्रूंचा नाश करण्यासाठी शत्रुहंता गणपतीची आराधना करावी.
10* आनंददायक गणपती- कुटुंबात आनंद, खुशी, उत्साह आणि सुख प्राप्तीसाठी घरात शुभ मुहूर्तावर आनंददायक गणपतीची मूर्ती स्थापित करावी.
11* विजय सिद्धी गणपती- कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळवण्यासाठी, शत्रू नाश, शेजारच्यांना शांत करण्याच्या उद्देश्याने घरात 'विजय स्थिराय नम:' असे मंत्र म्हणत बाबा गणपतीची या रूपात स्थापना करावी.
12* ऋणमोचन गणपती- ऋण चुकवले जात नसेल अश्या परिस्थितीत ऋण मोचन गणपतीची मूर्ती घरात लावावी.
13* रोगनाशक गणपती- जुना आजार, किंवा इतर रोग ज्यावर औषधं लागू पडत नसतील त्या घरात रोगनाशक गणपतीची आराधना करावी.
14 * नेतृत्व शक्ती विकासक गणपती- राजकारणी कुटुंबात उच्च पद प्रतिष्ठेसाठी गणपतीची या रूपात या मंत्रांद्वारे आराधना केली जाते- 'गणध्याक्षाय नम:, गणनायकाय नम: प्रथम पूजिताय नम:।'