शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2015 (15:38 IST)

विष्णू-गणेश एकच

मयूरेश पुराणातील एक गोष्ट आहे. पार्वतीकडे विश्वदेव नावाचा एक अतिथी आला. पार्वतीने त्यास नमस्कार करून जेवायला बसविले. तेवढय़ात त्यांच्या लक्षात आले की, आपण विष्णुतीर्थचे दर्शन घेतले नाही. तो तसाच पानासमोर बसून राहिला. गणेशाने विष्णूचे रूप घेऊन त्याला दर्शन दिले. भोजन झाल्यावर विश्वदेवाला त्यांच्या मनातील भेदाभेद वृत्ती जाणण्यासाठी एका बालकाची गणेशाने गोष्ट सांगितली.
 
एका मुलाने मातीची गणेशमूर्ती करून तिला माती-दगडाचा नैवेद्य दाखविला आणि तो नैवेद्य खाण्याची विनंती केली. त्या मुलाचा भक्तिभाव पाहून मातीची मूर्ती जिवंत झाली आणि माती दगडाच्या नैवेद्याचे खर्‍या लाडू-मोदकात रूपांतर केले. विश्वदेवाला गणेशाच्या जागी ही गोष्ट सांगताना कधी विष्णू तर कधी गणपती दिसू लागला. 
 
पद्मा तारके