शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (13:00 IST)

Gauri Visarjan आज तू गे जाणार आपल्या घरी ग गौराई

Gauri Visarjan
माझ्या घरी येणार तू म्हणून ग गौराई,
तयारी ची माझी सुरू होते लगीनघाई,
आठवून आठवून सारे ठेवते तयार,
हौशी हौशी ने सजवते मी  सुंदर मखर,
काही ऊण तर राहिलं नाहीना?चुटपुट लागते,
तरीही काहीतरी नेमकं राहूनच जाते,
आज तू गे जाणार आपल्या घरी ग गौराई,
डोळ्यांच्या कडा माझ्या हळूच ओल्या होई,
तुझ्या सेवेत काही उणपुरं  जर  राहिले असेल,
ठाऊक आहे मला तू ते पदरात घेशील,
ये पुन्हा लेकरा बाळा सवे, माहेरपणास,
उभी दिसेल मी तुला, तुझ्या स्वागतास!!
...अश्विनी थत्ते.