सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (21:40 IST)

Jyeshtha Gauri Visarjan 2022 :ज्येष्ठ गौरी विसर्जन मुहूर्त 2022 जाणून घ्या

ज्येष्ठ गौरी पूजा देवी गौरी म्हणजे पार्वतीला समर्पित आहे. गणेश चतुर्थी दरम्यान, हा सण भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी ज्येष्ठ गौरी पूजनाची स्थापना केली जाते, याला ज्येष्ठ गौरी आवाहन असे म्हणतात.

गौरीने भाद्रपदातील शुक्ल अष्टमीला असुरांचा संहार केला होता. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी सुवासिनी हा व्रत करतात. या व्रताला गौरीची पूजा ज्येष्ठ नक्षत्रावर केल्यामुळे यांना ज्येष्ठ गौरी म्हणतात. ज्येष्ठ गौरीचा हा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो, ज्यामध्ये आई पार्वतीची  पूजा केली जाते.येत्या 5 सप्टेंबर 2022 रोजी या पूजेची सांगता होणार आहे. या दिवसाला ज्येष्ठा गौरी विसर्जन असे म्हणतात. याचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे.

गौरी ची स्थापना आपापल्या पद्धतीने आणि परंपरेने केली जाते. गाजत वाजत गौरींना घरात आणले जाते. हळदी कुंकवाचे पाऊले घरात काढतात आणि त्यावरून गौरींचे आगमन केले जाते. विवाहित स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या चांगल्यासाठी देवी कडून आशीर्वाद मागतात. भाद्रपदाच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ गौरींचे आगमन होते. 

आगमन - यंदा गौरीचे आगमन शनिवार 3 सप्टेंबर 2022 रोजी झाले आहे. 
ज्येष्ठगौरी विसर्जन- गौरी विसर्जन चा मुहूर्त यंदा 5 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजून 5 वाजे पर्यंतचा आहे. त्यादिवशी मूळ नक्षत्र असल्यामुळे ज्येष्ठा गौरी विसर्जन रात्री 8 वाजून 5 मिनिटं पर्यंत आपल्या सुविधेनुसार कधीही करता येईल.