testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जागा वाढून मिळाल्या म्हणून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर दबाव

sharad panwar
मुंबई| wd| Last Modified शनिवार, 24 मे 2014 (10:30 IST)
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेससह राष्ट्रवादीला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. पराभव पचवावा लागल्यानंतरही आघाडीचे नेते एकमेकांच्या डोक्यावर पराभवाचे खापर फोडण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र राष्ट्रवादी कॉंगेसच्या शुक्रवारी चिंतन बैठकीत दिसून आले.


दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाढून मिळवण्यासाठी राष्‍ट्रवादीकडून कॉंग्रेसवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे. काँग्रेसने 2004 व 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात अधिक जागा मिळाल्याचा निकष लावून विधानसभा निवडणुकांसाठी जास्त जागांवर दावा सांगितला आणि त्या पदरात पाडून घेतल्या. मात्र, आता काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे खासदार जास्त निवडून आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचे सूत्र नव्याने ठरवायला हवे, असा दबाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर आणला आहे.

लोकसभेत काँग्रेसचे दोन, तर राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले आहेत. यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीची चिंतन बैठक पार पडली. त्यात पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडताना विधानसभेत जास्त जागांची मागणी केली.


काँग्रेस व मित्रपक्षांवर लोक नाराज असल्याचे दिसून आले आहे. विधानसभेला चारच महिने हातात
आहेत. पराभवाने खचून न जाता मार्ग काढण्याचा मी माझ्या परीने निर्णय घेतला आहे. दररोज 18 तास काम करणार आहे, असे पवारांनी सांगितले. तसेच राज्यांत एलबीटीच्या निर्णय प्रलंबित असल्याने व्यापारीवर्ग नाराज आहेत. मराठा, मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयातही आता चालढकल होऊ नये. उशीर लावला तर काय होते, हे दिसले. झटपट निर्णय घेतले नाही, तर विधानसभेत खरे नाही, असा टोला पवारांनी लगावला.

महिला, व्यावसायिक, सरकारी कर्मचारी यांचाही विश्वास संपादन करण्यात आघाडी सरकार म्हणून अपयशी ठरल्याचेही पवार यांनी कबूल केले.


यावर अधिक वाचा :

अशी रंगली राज ठाकरे यांनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत

national news
समाजात जातीयद्वेष हीच सध्या चिंतेची बाब आहे. मूठभरांच्या स्वार्थासाठी प्रशासकीय पाठबळावर ...

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

national news
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच बॅंकेने पाऊले ...

पोंझी स्कीम वाल्यांनो सावधानाता बाळगा नवीन कायदा

national news
नागरिकांना आकर्षक जाहिरातींद्वारे फसवून बेकायदेशीररित्या पोंझी स्कीम चालवणारे व ...

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !

national news
नीरव मोदी प्रकरणात सीझ करण्यात आलेल्या डायमंड्सची किंमत आकलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ...

नोकिया 6चं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च

national news
एचएमडी ग्लोबलने नोकिया 6 या फोनचं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. हा स्मार्टफोन ...

‘अॅपल’ च्या जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला

national news
‘अॅपल’ च्या एका जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला आहे. खुद्द रहमाननेच ट्विट करत ...

1 जुलैपासून 13 अंकांचे होतील मोबाईल नंबर

national news
नवी दिल्ली- 1 जुलै 2018 नंतर आपण मोबाईल नंबर घेत असाल तर आपल्याला दहा ऐवजी 13 अंकांचा ...

म्हणून ट्विटरच्या टीमने घेतली अमिताभ यांची भेट

national news
काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून काढता पाय घेण्याचा इशारा दिला ...

एअरटेलची नवी ऑफर, अवघ्या ९ रुपयाचा प्लान

national news
आता एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर सादर केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना ...