सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 20 मे 2014 (17:24 IST)

भाजप सरकार गरीबांना समर्पित- नरेंद्र मोदी

आपले प्रस्तावित भाजप सरकार देशातील गरीब जनता, युवापीढी तसेच महिला वर्गाला समर्पित असल्याचे प्रतिपादन देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

संसदेच्या सेट्रल हॉलमध्ये भाजपची बैठक  आज (मंगळवारी) झाली. या बैठकीत मोदींची संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्‍यात आली. बैठकीत मोदींनी मनोगत व्यक्त केले. मोदींनी प्रस्तावित सरकारची दिशा स्पष्ट केली. तसेच प्रस्तावित सरकार देशातील गरीब जनतेला समर्पित असल्याचे सांगितले. भाजपचे सरकार येणार असल्याचे आपले स्वप्न पूर्ण होण्याच्या सामान्य जनदेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. देशातील 125 कोटी जनतेच्या अपेक्षांच प्रतिनिधीत्व आपले सरकार करणार असल्याचेही मोदी म्हणाले. भाजपला पाच वर्षांच्या तपश्चर्यनंतर यश मिळाले आहे.