testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मोदींच्या शपथविधीसोहळ्यावर जयललितांचा बहिष्कार

jailalita
नवी दिल्ली| wd| Last Modified सोमवार, 26 मे 2014 (11:03 IST)
देशाची भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा सोमवारी (दि. 26 मे) होत आहे. या शपथविधी सोहळ्यावर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी
बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बहिष्कार घातल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, जयललिता यांच्यासह अण्णाद्रमुक पक्षाचा एकही सदस्य शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाही. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांना या कार्यक्रमास बोलावल्यास आपण गैरहजर राहणार असल्याचे जयललिता यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यामुळे जयललिता यांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे.

श्रीलंकेत तामिळ नागरिकांवर अन्याय होत आहे. या पार्श्वभूमीवर राजपक्षे मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र या सोहळ्याला आम्ही उपस्थिती देऊन तामिळ नागरिकांच्या भावना दुखावणार नसल्याचे जयललिता यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. एमडीएमकेचे सरचिटणीस वायको यांनीही राजपक्षे यांच्या भारत दौर्‍याला विरोध केला. राजपक्षे यांना सोमवारी काळे झेंडे दाखवून त्यांचे स्वागत केले जाणार असल्याचे वायको यांनी म्हटले आहे. तसेच यासंदर्भात द्रमुक आणि अण्णाद्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दिल्लीत निदर्शने केली.


यावर अधिक वाचा :

मोमोज खाण्याचा हट्ट केला, मद्यधुंद पित्याने मुलाला नदीत ...

national news
दिल्लीतील जैतापूर परिसरात मद्यधुंद पित्याकडे मुलाने मोमोज खाण्याचा हट्ट केला म्हणून नदीत ...

रेल्वेकडून स्वच्छतेसाठी पुढाकार

national news
रेल्वे स्थानकावरील व स्थानकाबाहेरील स्वच्छतागृहांमध्ये आता स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन्स आणि ...

फिफाचे फुटबॉल अॅन्थम ‘लिव इट अप’

national news
रशियात होणाऱ्या ‘फिफा वर्ल्डकप २०१८’साठी फिफाचे फुटबॉल अॅन्थम लॉन्च झाले आहे. हॉलिवूड ...

चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग

national news
आयपीएलच्या अंतिम फेरीत वानखेडेवर चेन्नई सुपर किंग्जच्या शेन वॉटसनने धडाकेबाज फटकेबाजी करत ...

जगातील सर्वात किमती घर

national news
'व्हिला ले' सीडर ही 187 वर्षांपूर्वी निर्माण केली गेलेली भव्य वास्तू आता विक्रीकरिता ...

नव्या व्यवसायाला चालना देण्यासाठी जीओचा पुढाकार

national news
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं जिओ जेन नेक्स्ट प्लॅटफॉर्म विकसीत केला आहे. ...

मायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन

national news
मायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...

Moto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री

national news
लेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...

आंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात

national news
इंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...

बीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान

national news
बीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...