testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मोदींच्या शपथविधी सोहळ्यातील निमंत्रितांची यादी तयार

narendra modi
नवी दिल्ली| wd| Last Modified शनिवार, 24 मे 2014 (15:26 IST)
मोदींच्या शपथविधीला सलमान, अमिताभ आणि रजनीकांत यांना निमंत्रण
देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळय़ासाठी एकीकडे राष्ट्रपती भवनातर्फे जोरदार तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे भाजपामध्येही पाहुण्यांच्या निमंत्रणाची लगबग सुरू असून निमंत्रितांची यादी जवळपास पूर्ण झाली आहे. या सोहळय़ासाठी खास मोदींच्या आग्रहावरून लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, रजनीकांत या कला क्षेत्रातील दिग्गजांसह क्रिकेटचा देव भारतर▪सचिन तेंडुलकरलाही आमंत्रित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

भाजपाच्या आमंत्रितांच्या यादीत सुमारे ३ हजार पाहुण्यांचा समावेश आहे. 'सार्क' राष्ट्रांचे प्रमुख अथवा त्यांचे प्रतिनिधी प्रथमच भारताच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला येत आहेत. शेजारील राष्ट्रांसोबतच देशातीलही काही प्रमुख पाहुण्यांना मोदींनी आमंत्रित केले असून यामध्ये विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांचा समावेश आहे. गुजरातचे ब्रॅण्ड अँम्बेसिडर असलेले बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनाही या शपथ सोहळय़ासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या दोन्ही कलाकारांनी मोदींचे कधी उघडपणे सर्मथन केले नसले तरी मोदींसोबत त्यांचे घनिष्ट संबंध आहेत. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर, अभिनेता सलमान खान आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनाही मोदींनी निमंत्रण पाठवले आहे. लतादीदी मोदींच्या प्रशंसक असून सलमान आणि त्याचे वडील सलीम खान हेदेखील मोदींच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभागी झाले आहेत. सार्क देशांमधील अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंकेने शपथ सोहळय़ाचे आमंत्रण स्वीकारले आहे.

राष्ट्रपती भवनाच्या विशाल प्रांगणामध्ये २६ तारखेला संध्याकाळी ६ वाजता नरेंद्र मोदी देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. या सोहळय़ाला दिमाखदार बनविण्यासाठी राष्ट्रपती भवनाचे अधिकारी-कर्मचारी दिवसरात्र मेहनत करत असून राष्ट्रपतींच्या सचिव अमिता पॉल जातीने सर्व तयारीवर लक्ष ठेवून आहेत. कार्यक्रमस्थळी रेड कार्पेटसह ऐतिहासिक निळा गालिचाही अंथरला जाणार आहे. पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था अर्धचंद्राकार आहे. विशेष पाहुण्यांसाठी राष्ट्रपती भवनात तर इतरांसाठी प्रांगणात चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने येणार्‍या पाहुण्यांची राहण्याची सोय करण्यासाठी सरकारी निवासस्थाने आणि हॉटेल्सही बुक करण्यात आली आहेत.


यावर अधिक वाचा :

पासपोर्ट काढणे झाले सोपे, नियमांमध्ये झाला बदल

national news
काही दिवसांपासून परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट काढण्याच्या नियमांमध्ये काही दिलासादायक ...

अश्लील चाळे: समाजाची काय भूमिका?

national news
समाजातील विकृती आणि महिला सुरक्षाव्यवस्था कुचकामी हे पुन्हा समोर आले आहे. यामध्ये आर्थिक ...

वीर सावरकर यांच्याबद्दल 10 विशेष गोष्टी

national news
विनायक दामोदर सावरकर दुनियेतील एकमेव असे स्वातंत्र्य-योद्धा होते ज्यांना 2-2 जन्मठेपेची ...

उद्यापासून १२ वीची परीक्षा, विद्यार्थ्यांनी वेळेवर ...

national news
राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण माध्यमिक मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या 12 वी परीक्षेसाठी 14 लाख ...

म्हणून ट्विटरच्या टीमने घेतली अमिताभ यांची भेट

national news
काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून काढता पाय घेण्याचा इशारा दिला ...

एअरटेलची नवी ऑफर, अवघ्या ९ रुपयाचा प्लान

national news
आता एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर सादर केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना ...

प्रियाच्या 'त्या' विडीओने केली लाखोंची कमाई

national news
सोशल मिडीयावर प्रचंड गाजलेल्या प्रिया प्रकाश वारियरने केवळ एक डोळा मारून लाखोंची कमाई ...

'यु ट्यूब' चे 14 व्या वर्षात पर्दापण

national news
चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या त्रिकुटाने जन्माला घातलेली यु ट्यूब' चे 14 व्या ...

हो, हो, आता जिओ फोनवर फेसबुक वापरता येणार

national news
जिओने ग्राहकांना सुखद धक्का देत जिओचा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आता या फोनवर फेसबुक ...

ती व्हायरल होणारी सुंदरी आहे तरी कोण?

national news
कालपासून फेसबुक असो कि व्हाट्सअप सगळीकडे एकाच तरुणीचा बोलबाला आहे. तिचा हा व्हिडीओ मोठ्या ...