मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 20 मे 2014 (17:52 IST)

राज ठाकरेंची लवकरच मुंबईत जाहीर सभा

शिवसेनेविरोधात 'औकात' दाखवण्याचे वक्तव मनसे प्रमुख राज ठाकरेंना चांगलेच महागात पडले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्यातील जनतेनेच राज ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिली. राज ठाकरेंना मराठी जनतेचे सपशेल नाकारले. राज ठाकरेंच्या दहाही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली. आता राज ठाकरे लवकरच जाहीर सभा घेणार आहे. यासभेत पक्षाच्या पुढील कार्यक्रमाची दिशा राज स्पष्ट करणार असल्याचे शिशिर शिंदे यांनी आज (मंगळवार) सांगितले.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. मनसेचे पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांची आज (मंगळवार) राजगडावर चिंतन बैठक झाली. या बैठकीनंतर राज ठाकरे लवकरच मुंबईत जाहीर सभा घेणार असल्याचे उपस्थित पत्रकारांना शिंदे यांनी माहिती दिली. राज यांच्या सभेची तयारी सुरु करण्‍यात आली आहे.
'मोदी जिंकले बाकी सगळे हरले' अशी कुचकट प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी मातोश्रीवर सहा फुटाचा पुष्पगुच्छा पाठवला होता. राज ठाकरे आता जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे तर्कवितर्क व्यक्त केला जात आहे.