सोनिया गांधींचा राजीनामा फेटाळला
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा राजीनामा काँग्रेस कार्यकारिणीच्या दिल्लीतल्या बैठकीत फेटाळण्यात आला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर सोनिया आणि राहुल गांधी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून आपापल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या उपस्थित सोमवारी झालेल्या बैठकी राजीनामा फेटाळण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. काँग्रेस अध्यक्ष या नात्याने सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष या नात्याने राहुल गांधी यांनी आपला राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती.