शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 15 एप्रिल 2014 (14:49 IST)

24 तासात सहा लाखांहून अधिक ट्विटस्

लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल साईटचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. यात सध्या ट्विटरने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईटमधील ट्विटरवर लोकसभा निवडणुकीसंदर्भातील ट्विटची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ट्विटरवर गुरुवारी 24 तासात निवडणुकीसंबधित सहा लाख 28 हजार ट्विटची नोंद झाली.

निवडणुकीतील उमेदवार, पत्रकार आणि सामान्य नागरिक निवडणुकांसदर्भातील बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, आपले मत मांडण्यासाठी ट्विटरचा वापर मोठ्या संख्येने करत असल्याचे ट्विटरचे म्हणणे आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ट्विटरचा वापर सर्वाधिक करतात. त्यापाठोपाठ आम आदमी पार्टी यांच्याद्वारे अधिक प्रमाणात ट्विट केले जातात.

गुरुवारी 24 तासात निवडणुकीसंदर्भात सहा लाख 28 हजार ट्विट करण्यात आल्याचे ट्विटरने सांगितले. किरण बेदी यांच्या ट्विटरवर सर्वाधिक रिट्विट केले जात आहे. त्याचबरोबर पत्रकार अनुराग धंडा यांनी मोदींच्या विवाहाबद्दल केलेल्या पोस्टवरही अधिक ट्विट केले जात असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.