शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By WD|
Last Modified: रत्नागिरी , मंगळवार, 15 एप्रिल 2014 (17:07 IST)

उद्धव ठाकरेंचे बेडूक झालेय; राणेंची खोचक ‍टीका

'पाऊस पडल्यावर बेडकाचा आवाज येतो, तशी अवस्था सध्या उद्धव ठाकरेंची झाली आहे. निवडणुका आल्या की उद्धव ठाकरे बिळातून बाहेर पडतात' अशी खोचक टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केली आहे.

रत्नागिरीत रविवारी(13 एप्रिल) महायुतीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर टीका केली होती. त्या टीकेला राणेंनी रत्नागिरीतल्या सभेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.