शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Updated :नवी दिल्ली , गुरूवार, 8 मे 2014 (18:59 IST)

केजरींचे मोदींना खुले आव्हान

आम आदमी पक्षाचे (आप) अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून मोदी आणि केजरीवाल एकमेकांविरोधात लढत आहेत. 
 
केजरीवाल म्हणले, नरेंद्र मोदींनी पवित्र गंगा आरतीस अनुपस्थित राहून राजकारण केले आहे. त्यांनी वाराणसीतील जनतेच्या प्रश्नांसंबंधी खुल्या चर्चेस यावे, असे केजरीवाल यांनी खुले आव्हान दिले आहे. भाजपमध्ये आता भीतीची वातावरण न‍िर्माण झाले आहे. त्यामुळे भाजपचे अनेक दिग्गज नेते वाराणसीत दाखल झाले आहेत.

दरम्यान, मोदींना निवडणूक आयोगाने एक सभा घेण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मोदींनी गंगा आरतीस अनुपस्थित राहत असल्याचे सांगत, गंगा मातेची माफी मागितली आहे.