शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: मुंबई , शनिवार, 19 एप्रिल 2014 (12:08 IST)

'भविष्यात उद्धव-राज एकत्र येऊ शकतात'

'शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व माझ्यात कुठलेही कौटुंबिक वाद नसून राजकीय मतभेद आहेत आणि भविष्यात कदाचित आम्ही एकत्र येऊही शकतो', असे संकेत महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत दिले.'

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुढे काहीही घडू शकते हे सांगताना उद्धव-राज एकत्र येऊही शकतात असे सूचक विधान करून विधानसभेच्या निवडणुकांमध्ये वेगळे चित्र बघायला मिळेल असे संकेत त्यांनी दिले आहेत. नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा असून आपले खासदार त्यांना बिनशर्त पाठिंबा देतील, असे सांगत भाजपाला आपला पाठिंबा नाही व राजनाथ सिंहांना आपण महत्त्व देत नाही याचा पुनरुच्चार ठाकरेंनी केला. यंदा अकरा जागांवर मनसे लोकसभेच्या निवडणुका लढवत असून त्यातील केवळ दोन जागांवर त्यांचा सामना भाजपाच्या उमेदवाराशीही आहे. बाकी ठिकाणी मनसे व शिवसेना आमने-सामने आहे. भाजपाच्या मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात असले तरी मी मला पाहिजे त्या ठिकाणी उमेदवार दिल्याचे व माझी काय ताकद आहे हे निवडणुकीनंतर दिसणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.