शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 9 मे 2014 (15:47 IST)

राहुल गांधींना होऊ शकते तीन वर्षांची शिक्षा?

केंद्रीय निववडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्यास कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. अमेठीत मतदान सुर असताना राहुल गांधी यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला होता.

राहुल गांधी यांच्यासाठी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग शुक्रवारी चौकशी करून निर्णय देणार आहे. राहुल गांधी दोषी आढळल्यास त्यांना तीन महिन्यांचा तुरुंगावासाची शिक्षा होऊ शकते. राहुल गांधी यांनी अमेठीत मतदान सुरु असताना ईव्हीएमजवळ उभे राहून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय चुनाव आयोगाला याप्रकरणाशी संबंधित माहिती अमेठी जिल्हा निवडणूक अधिकारीकडून प्राप्त झाली आहे. राहुल गांधी या प्रकरणी दोषी आढळल्यास त्यांना कमीत कमी तीन महिन्यांचा तुरुंगवास अथवा दंडात्मक कारवाईची शिक्षा होऊ शकते.

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार 'रिप्रजेंटेशन ऑफ पीपल्स अॅक्ट' कलम 128 चा भंग केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात कारवाईचे शस्त्र उपसले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.