शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By WD|
Last Modified: अकोला , मंगळवार, 8 एप्रिल 2014 (15:48 IST)

'शिवसेना- भाजपमध्ये भांडण लावण्याचा मनसेचा उद्योग'

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये भांडण लावून देण्याचा सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने नवा उद्योग सुरु केला असल्याची टीका भाजपचे  नेते विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

मनसेचा गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकही उमेदवार विजयी झाला नव्हता, परंतु, जवळपास 11 जागांवर मनसे व सेना-भाजपाच्या उमेदवारांमध्ये मते  विभागली गेल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. यावेळी पुन्हा मतविभागणीचा फटका बसू नये, यासाठी नितिन गडकरी यांनी राज ठाकरे  यांना उमेदवार उभे न करण्याचे आवाहन केले होते. परंतु, आपला राजकीय पक्ष असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी त्यांचे आवाहन धुडकावल्याचे वरकरणी  सांगितले. परंतु पुण्यासारखा अपवाद वगळता, भाजपाच्या उमेदवारांसमोर मात्र त्यांनी उमेदवार उभे करण्याचे टाळले.