शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Modified: पिंपरी , गुरूवार, 17 एप्रिल 2014 (10:52 IST)

शेकापचे उमेदवार आ. लक्ष्मण जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क

मावळ लोकसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी  रिपब्लिकन पार्टी पुरस्कृत उमेदवार आ. लक्ष्मण जगताप यांनी आज सकाळी 7:05 वा. आपला मतदानाचा हक्क बजावला.

पिंपळे गुरव येथिल पीसीएमसी शाळा क्र. 54 या शाळेत त्यांच्या कुटूंबियांनी देखिल मतदान केले. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आ. जगताप म्हणाले कि, मावळ लोकसभा मतदार संघात 50 ते 55 टक्के मतदान होईल. नागरीकांचा मतदानासाठी  उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मतदानाच्या दिवसाची ते वाट पहात होते. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी माझी लढाई आहे. शेतकरी कामगार पक्षाची घाटाखाली असणारी ताकद व घाटावरील नागरीकांच्या प्रश्नांसाठी मी उभारलेला लढा पाहता माझा विजय निश्चित आहे. चिंचवड विधानसभा क्षेत्रात सुमारे 1.25 लाख आणि घाटाखालील तीन विधानसभा क्षेत्रात सुमारे 3 लाख असे एकूण 6 लाखांचे मताधिक्यं मिळवून मी निवडून येईल.