शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गोवा विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (17:14 IST)

Opinion Poll: गोव्यात BJPला पाठिंबा मिळेल की काँग्रेस आणि आप चमत्कार करतील? सर्वेक्षण पहा

goa election
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघा आठवडा उरला आहे. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष पूर्ण जोमाने मैदानात उतरले आहेत. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी जनता कोणाच्या पाठीशी जाणार, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. भाजपवर विश्वास ठेवणार की काँग्रेस आणि आपची निवड करणार. त्यासाठी निवडणुकीच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे.
 
दरम्यान, सोमवारी सी व्होटरचे खुले मतदान समोर आले आहे. जनमत चाचण्यांनुसार, राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळत असल्याचं दिसत असले तरी ते आधीच्या बहुमतापर्यंत पोहोचत नाहीयेत. सर्वेक्षणानुसार भाजपला 14-18 जागा मिळू शकतात. सर्वेक्षणानुसार, काँग्रेसला 10 ते 14, आम आदमी पार्टीला 4-8, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला (एमजीपी आघाडी) 3-7 जागा मिळू शकतात. तर इतरांच्या खात्यात शून्य ते दोन जागा जाऊ शकतात. गोव्यात विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. येथे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांना 21 जागांची आवश्यकता आहे.
 
दुसरीकडे, जर आपण मतांच्या टक्केवारीबद्दल बोललो तर भाजपला 30 टक्के, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीला 24-24 टक्के आणि एमजीपीला 8 आणि इतरांना 14 टक्के मते मिळू शकतात. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. काँग्रेसला 17 तर भाजपला 13 जागा मिळाल्या. सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात अपयश आले. 
 
कोणाच्या खात्यात किती जागा?
एकूण जागांची संख्या- 40 
भाजप- 14-18
कॉंग्रेस-10-14
आप- 4-8 
MGP आघाडी- 3-7 
इतर- 0-2