testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वसंतशोभा

vasant
ND
चैत्र हा वसंताच्या आगमनाचा महिना आहे. आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतानाच चैत्रपालवी झाडावर झळाळू लागते. गीतरामायणात रामाच्या जन्माच्या वर्णनाच्या वेळी (कारण रामनवमी चैत्रातच असते ना!) ग.दि.मा. म्हणतात, ''गंधयुक्त तरिही उष्ण वात ते किती...'' गरम असली तरी हवा गंधयुक्त म्हणजेच सुगंधित असते कारण सर्वात सुवासिक असा मोगरा याच काळात फुलतो, बहरतो.

गरमीच्या झळा जाणवत असताना आगीच्या ज्वालांप्रमाणे भासणारा पांगारा, पूर्ण फुलांनी डवरलेला निष्पर्ण (रस्त्यावर लाल रंगाचा गालिचा पसरवणारा) गुलमोहर पळस यासारखे मोठे वृक्षही आपले थोराडपण विसरून नव्या नव्हाळीने सजतात.

aam
ND
फळांचा राजा तर याच काळात मोहरतो, फळतो अन् आपल्या रसाळ गोमट्या फळांनी लहान थोरांची, गरीब-श्रीमंताची रसना तृप्त करायला तयार होत असतो. सगळीकडे उत्तमोत्तम गोष्टींची पखरण करणारा हा म्हणजे एखाद्या राजाच आहे (ऋतूंचा राजाच म्हणाना !) राजाच तो, त्याला कशाची कमतरता, सगळ अगदी व्यवस्थित, साग्रसंगीत व आपल्या उच्च अभिरुचीनुसार तो घडवतो जसे मोगर्‍याचा सुगंध, आंब्याची डाळ, पन्हे, वाळ्याचे पडदे हा सारा थाट, ही व्यवस्था त्याच्या आगमनाचीच. असतात. मंगळागौर, डोहाळजेवण, हळदीकुंकू यासारखे (बायकी!) सण म्हणजे त्यांच्यातील सृजनाला आवतण. गौर सजवणे, वेगवेगळ्या रांगोळ्या, कला कुसरीच्या वस्तू, पाकक्रियेतली निपुणता हयात त्या हळूहळू पारंगत होत असाव्यात.

हल्ली या प्रकारचे समारंभ आपल्याला वेळानुसार, सवडीनुसार का होईना पण होतातच आणि त्यातून सर्वजण आनंदही मिळवतात कारण आजच्या धकाधकीच्या आयुष्यातही प्रत्येकीला मोकळे होण्यासाठी अशी संधी मिळणे गरजेचेच आहे.

वेबदुनिया|

vasant
ND
याच महिन्यात 'बालचंद्रमा व्रत' करतात म्हणजे सूर्यास्ताला अंघोळ करून आकाशातल्या चंद्राची किंवा तांदळा पासून चंद्र तयार करून त्याची पूजा करायची. (बालचंद्रमसे नम:) प्रत्येक महिन्याच्या चंद्रदर्शना दिवशी ह्या प्रमाणे करावे वर्षभर हे करतात व ह्या दिवशी तळलेले पदार्थ खात नाहीत.


यावर अधिक वाचा :

एकादशीला या 9 पैकी करा 1 उपाय, धन वाढेल

national news
एकादशीला प्रभू विष्णूंना केशर कालवलेल्या दुधाने अभिषेक करावे. याने प्रत्येक मनोकामना ...

'क्रियामाण' कर्म म्हणजे काय

national news
या जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास 'क्रियामाण' कर्म म्हणतात. अर्थात, हे ...

आवळा नवमी: लक्ष्मी देवींनी सुरु केलेली परंपरा

national news
आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वत: देवी ...

आवळा नवमीला काय करावे काय नाही, जाणून घ्या

national news
पुराणांप्रमाणे अक्षय नवमी अर्थात आवळा नवमीच्या दिवशी केलेल्या पुण्याचे फल अनेक ...

हिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे

national news
शेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...

राशिभविष्य