शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. गुढीपाडवा
Written By वेबदुनिया|
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2010 (13:05 IST)

गुढीपाडवा दोन दिवस

चैत्र शुक्ल प्रतिपदापासून नववर्षाचा प्रारंभ होतो. याच दिवशी चैत्री नवरात्र घटस्थापनाही होते. पण गेल्या तीन ते चार वर्षापासून या दिवसाबाबत काहीशा गोंधळाची स्थिती उत्पन्न झाली आहे. कारण ग्रहांमधील बदल, तिथी, नक्षत्र, योग, करण यांचे प्रवेश हे सगळे भारतीय वेळेनुसार असते. पण वार हा सूर्योदयावर अवलंबून आहे. आणि सूर्योदय प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो. नववर्षाचा प्रवेशही सूर्योदयाची तिथी व वाराशी संबंधित आहे. यंदा प्रतिपदा तिथी ७ एप्रिलला सकाळी सहा वाजून ९ मिनिटांपर्यंत आहे. ज्या टिकाणी सूर्योदय सोमवारी सात एप्रिलला सहा वाजून ९ मिनिटांच्या आधी होतो, तेथे नव्या वर्षाचा प्रारंभ सात एप्रिलला होईल. पण ज्या ठिकाणी सूर्योदय सहा वाजून ९ मिनिटांनंतर होईल, तेथे नववर्षाचा प्रारंभ ६ एप्रिलला (रविवारी) होईल. कारण सात एप्रिलला या ठिकाणी प्रतिपदेच्या स्थितीचा क्षय झालेला असेल. अमावस्यायुक्त प्रतिपदेला नववर्ष प्रारंभ होतो, अशी परंपरा आहे.

खालील ठिकाणी सहा एप्रिलला (रविवारी) गुढीपाडवा आहे.
मुंबई, पुणे, सोलापूर, जळगाव, भुसावळ, नाशिक, इंदूर, अहमदाबाद, धार आदी.

खालील ठिकाणी सात एप्रिलला (सोमवारी) गुढीपाडवा आहे.
नागपूर, अमरावती, दिल्ली, हैदराबाद, जबलपूर, रायपूर, भोपाळ आदी.

यंदा झाली तशी गोंधळाची स्थिती आणखी २४ वर्षांनतर पुन्हा येईल. या संवत्सराचे नाव प्लव आहे. या संवत्सरा पाऊस भरपूर होण्याची अपेक्षा आहे. काही ठिकाणी पूरही येईल. नैसर्गिक आपत्तींचा या काळात सामना करावा लागेल.