testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गुरूदक्षिणा

guru purnima
वेबदुनिया|
सूर्य न चुकता प्रकाश देतो, ढग, पाऊस देतो. हवा कोणताही भेदभाव न करता सर्वांना जिवंत ठेवते. फूलही सुगंध देण्याचा धर्म सोडत नाहीत. त्याचप्रमाणे गुरूजनही शिष्यांच्या कल्याणासाठी कार्य करतात. शिष्यांकडून गुरूदक्षिणा घेण्याचा त्यांचा उद्देश नसतो. परंतु शिष्याचे सूर्याप्रमाणे देदिप्यमान होणे हीच गुरूला दिलेली सर्वांत योग्य गुरूदक्षिणा आहे.
प्राचीन काळातील एक कथा आहे. एक गुरू आपल्या आश्रमासाठी खूप चिंताग्रस्त होते. ते वृद्ध होत चालले होते आणि त्यांना उरलेले जीवन हिमालयात घालवायचे होते. पण आश्रम योग्य प्रकारे चालवू शकेल असा उत्तराधिकारी कोण असेल याची चिंता त्यांना पडली होती. आश्रमात दोन शिष्य होते. दोघेही गुरूला प्रिय होते. एके दिवशी गुरूंनी त्यांना बोलावून घेतले. मी तीर्थयात्रेला जात असून तुम्हाला दोन मुठी गहू देतो आहे. मी परत येईल तेव्हा मला दोन मुठी गहू परत द्या.

जो शिष्य मला हे गहू सुरक्षित देईल, मी त्याला या गुरूकुलाचा प्रमुख म्हणून नियुक्त करेन. दोघांनी गुरूंना आज्ञा पाळू असे वचन देऊन निरोप दिला. काही महिन्यांनंतर गुरू परत आले. त्यांनी दोघांपैकी एका शिष्याला बोलविले. हा शिष्य या गव्हाची पुरचुंडी बांधून त्याची पूजा करीत होता. त्याने गव्हाची पुरचंडी गुरूंना दिली. त्यातील गहू पार सडून गेले होते. आता त्यांचा कोणताही उपयोग नव्हता.

नंतर गुरूंनी दुसर्‍या शिष्याला बोलाविले. तो गुरूंना आश्रमामागे घेऊन गेला. तेथे त्याने समोरचे शेत दाखवून गुरूंना सांगितले, हे तरारून आलेले पीक पहाताय ना ते तुम्ही दिलेल्या दोन मुठी गव्हातून उभे राहिले आहे. त्यामुळे आपण मला क्षमा करा. तुम्ही दिलेले गहू मी तुम्हाला परत देऊ शकत नाही. डोलणारे हिरवेगार पीक पाहून गुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले, जो शिष्य गुरूचे ज्ञान वाटतो तोच उत्तराधिकारी होण्यास पात्र आहे. गुरूसाठी हीच खरी गुरूदक्षिणा आहे.

सामान्यतः गुरूदक्षिणेचा अर्थ बक्षिस वा आर्थिक मोबदला असा घेतला जातो, परंतु तो खऱा अर्थ नाही. गुरूदक्षिणेचा अर्थ खूप व्यापक आहे. गुरूकडून प्राप्त झालेल्या शिक्षणाचा किंवा ज्ञानाचा प्रसार-प्रचार व त्याचा योग्य उपयोग जनकल्याणासाठी करावा हीच खरी गुरूदक्षिणा आहे. गुरूदक्षिणेचा अर्थ शिष्याच्या परिक्षेसंदर्भातही घेतला जातो. गुरूदक्षिणा गुरूप्रती सन्मान व समर्पण या भावनेचे प्रतीक आहे. गुरूला योग्य दक्षिणा म्हणजे तुम्ही स्वत: गुरू बना. खरा गुरू तोच की जो शिष्याला स्वत: चे गुरूत्व बहाल देतो.

गुरूदक्षिणा अशा वेळी दिली जाते किंवा घेतली जाते, ज्यावेळी शिष्य गुरूने दिलेल्या ज्ञानाने ओथंबलेला असतो. अर्थात, शिष्यच गुरू होण्याच्या स्थितीत आलेला असतो. गुरूजवळचे समग्र ज्ञान जेव्हा शिष्य ग्रहण करून घेतो आणि गुरूजवळ देण्यासाठी काहीही उरलेले नसते तेव्हा गुरूदक्षिणेचे सार्थक होते.


यावर अधिक वाचा :

देवघरात नका ठेवू या मूरत्या

national news
वास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...

कोकिलाव्रत कथा

national news
ब्रम्हदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती, त्याला 101 कन्या होत्या. ज्येष्ठ कन्या ...

स्वप्नात दिसले बदाम आणि अंडी तर याचा अर्थ जाणू घ्या...

national news
बर्‍याच वेळा स्वप्न आमच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. कधी कधी असे ही होते की ज्या ...

साईबाबांचे दोहे

national news
तद अभिमान न कीजिए, कहैं साई समुझाय। जा सिर अहं जु संचरे, पड़ै चौरासी जाय॥

कोकिलाव्रत: कसे करावे?

national news
ज्या वर्षी आषाढ अधिकमास येईल त्यानंतरच्या शुद्ध आषाढ पौणिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत ...

राशिभविष्य