शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (08:40 IST)

हनुमानाच्या जन्मासंबंधी प्रचलित कथा

चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. हनुमानाला महादेव शिवशंकाराचा अवतार मानले जाते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता.
 
हनुमानाला मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते. त्यांच्या जन्माबद्दल अनके पौराणिक कथा आहेत. या कहाणीत हनुमानाच्या जन्मासंबंधी त्यापैकी एक प्रचलित कथा सांगत आहोत-
 
हनुमंताला महादेवांचा 11वा रूद्र अवतार असल्याचं म्हटलं जातं. त्यांच्या जन्मासंबंधी कहाणी खूप रोचक आहे. ते माता अंजनी आणि वानर राज केसरी याचे पुत्र होते. त्यांचा 
 
जन्म सामान्य संयोग नसून देवतागण, नक्षत्र आणि सर्व देवतांच्या आशीर्वादाने पृथ्वीहून पापांचा नायनाट करण्यासाठी झाला होता. मान्यतेप्रमाणे माता अंजनीला वरदान होते की त्यांचा होणारा पुत्र महादेवांचा अंश असेल. या व्यतिरिक्त एक मान्यता ही देखील आहे की जेव्हा बजरंगबली जन्मास आला तेव्हा रावणाच्या घरी देखील एका पुत्राने जन्म घेतला. हा संयोग चांगले आणि वाईटाचे संतुलन राखण्यासाठी झाले.
 
सत्ययुगाची गोष्ट आहे, जेव्हा माता अंजनी जंगलात बसून पुत्र प्राप्तीसाठी भगवान शिव यांची पूजा करत होती. त्या हात जोडून, डोळे मिटून आराधना करत असताना त्यांच्या समोर फळं येऊन पडलं. अंजनीने फळ प्रसाद समजून त्याचे सेवन केलं.
 
वास्तविक, जेव्हा माता अंजनी जंगलात पूजा करीत होती तेव्हा तेथून लांब अयोध्यामध्ये राजा दशरथ देखील पुत्र प्राप्तीसाठी शिव-यज्ञ करत होते. या हवनानंतर ऋषींनीने राज दशरथ यांच्या तिन्ही राण्यांना फळं दिलं, ज्यांचे सेवन केल्यानंतर त्यांना पुत्र प्राप्ती झाली. या फळांतून एक लहानसा अंश पक्ष्याने उचलून देवी अंजनीसमोर ठेवून दिला.
 
या प्रकारे महादेवांच्या आशीर्वादाने केसरीनंदन हनुमानाचा जन्म झाला.