गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By
Last Modified: मंगळवार, 7 एप्रिल 2020 (17:22 IST)

हनुमान चालीसा: आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल, जाणून व्हाल हैराण

1. आध्यात्मिक बल : आध्यात्मिक बलामुळे आत्मिक बल प्राप्ती होते आणि आत्मिक बलामुळे शारीरिक बल प्राप्त करून प्रत्येक प्रकाराच्या आजारांवर विजय प्राप्त करता येऊ शकते. दररोज हनुमान चालीसा पाठ केल्याने मन आणि मस्तिष्कामध्ये आध्यात्मिक बल प्राप्ती होते.
 
2. मनोबल वाढतं : नित्य हनुमान चालीसा पाठ केल्याने पवित्रतेची भावना विकसित होते ज्याने मनोबल वाढतं. मनोबल मजबूत असल्यास संकटापासून सहज मुक्ती मिळते. हनुमान चालीसा मधील एक ओळ आहे- अष्ट सिद्धी नव निधि के दाता, असवर दिन जानकी माता।
 
3. अकारण भय व ताण मुक्ती : हनुमान चालीसामध्ये एक ओळ आहे - भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे। किंवा सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना। या ओळींचा अर्थ मनात असणारे अकारण भीतीपासून मुक्ती. हनुमान चालीसा पाठ केल्याने भीती आणि तणावापासून मुक्ती मिळते.
 
4. रोगावर नियंत्रण : हनुमान चालीसा मध्ये एक ओळ आहे - नासै रोग हरे सब पीरा, जपत निरन्तर हनुमत बीरा। किंवा बल बुधि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार। अर्थात कोणत्याही प्रकाराचा आजार असल्यास आपण केवळ श्रद्धापूर्वक हनुमानाचा जप करत राहावा. हनुमान प्रत्येक पीडा दूर करतील. कोणत्याही प्रकाराचा क्लेश अर्थात कष्ट असल्यास तो मिटेल. केवळ श्रद्धा आणि विश्वास असावा. अर्थात औषधांसह भक्ती पण करा. सर्व पीडांपासून मुक्ती मिळेल.
 
5. संकट हरणारे : आपल्याला कोणत्याही प्रकाराचं शारीरिक किंवा मानसिक संकट असलं किंवा प्राण संकटात असले तरी ही ओळ वाचा- संकट कटै मिटै सब पीरा, जो सुमिरै हनुमत बलबीरा। किंवा संकट तें हनुमान छुड़ावै, मन क्रम बचन ध्यान जो लावै। याने आपल्या नवीन उमेद जागृत होईल. 
 
6. बंधन मुक्ती उपाय : असे म्हणतात की दररोज 100 वेळा हनुमान चालीसा पाठ करणारे बंधन मुक्त होऊन जातात. मग बंधन आजारा असो वा शोक. हनुमान चालीसा मध्ये लिखित आहे - जो सत बार पाठ कर कोई, छूटहि बन्दि महा सुख होई। 
 
7. नकारात्मक प्रभाव दूर होतात : सतत हनुमान चालीसा पाठ केल्याने घर, मन आणि शरीरातून नकारात्मक ऊर्जेचं निष्कासन होतं. निरोगी आणि निश्चिंत राहण्यासाठी जीवनात सकारात्मकता आवश्यक आहे. सकारात्मक ऊर्जा व्यक्तीला दीर्घजीवी करते.
 
8. ग्रहांचे प्रभाव दूर होतात : ज्योतिषनुसार प्रत्येक ग्रहाचा शरीरावर वेगळा प्रभाव पडत असतो. वाईट प्रभाव पडत असल्यास त्या ग्रहासंबंधी आजार होतात. जसे सूर्यामुळे हृदयगती कमी-जास्त होणे, शरीर अकडून जाणे, शनीमुळे फुफ्फुसांचा आकुंचन, श्वास घेण्यात त्रास होणे, चंद्रामुळे मानसिक आजार व इतर. या प्रकारे सर्व आजार ग्रहांमुळे उत्पन्न होतात. म्हणून पवित्र राहून नियमाने हनुमान चालीसा पाठ केल्यास ग्रहांच्या वाईट प्रभावापासून बचाव होतो. 
 
9. घरातील कलह दूर होतं : कुटुंबांत कोणत्याही प्रकाराचे वाद असल्यास याचा परिणाम मानसिक आणि नंतर शारीरिक आजार या रूपात होतो. दररोज हनुमान चालीसा पाठ केल्याने मनाला शांती लाभते. वाद दूर होतात आणि घरात आनंदी वातावरण राहतं. 
 
10. वाईट सवयी सुटतात : जर आपण दररोज हनुमान चालीसा पाठ करत असाल तर आपण वाईट सवयींपासून दूर व्हाल. जसे नशा करणे, परस्त्री वर डोळा ठेवणे आणि क्रोध, मोह, लोभ, ईर्ष्या, मद, काम सारखे मानसिक विकार.