शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

अमावस्या विशेष : 8 सोपे उपाय बदलून देतील तुमचे भाग्य...

26 एप्रिल 2017 रोजी वैशाख महिन्याची अमावस्या येत आहे. या दिवशी जर नदीत अंघोळ करणे आणि पितृ तर्पणाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांच्या निमित्ताने तरपण केल्याने पितृ दोष दूर होतो तथा मनुष्याची प्रगती होण्यास मदत मिळते. आमच्या ज्योतिष शास्त्रात देखील आमावस्याचे  (Amavasya )विशेष महत्त्व आहे. मान्यता अशी आहे की है कि या दिवशी करण्यात  आलेले उपाय, टोटके विशेष शुभ फल प्रदान करतात. म्हणून जीवनात येणार्‍या अडचणींना दूर करण्यासाठी अमावस्याच्या दिवशी निम्न उपाय केले पाहिजे.  
 
* अमावस्याच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी  केल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार कराव्या. गोळ्या करताना देवाचे नाव घेतले पाहिजे. त्यानंतर जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या गोळ्या मासोळ्यांना खाऊ घाला. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बरीच अडचणी दूर होऊ शकतात.  
 
* या दिवशी काळ्या मुंगळ्यांना साखर मिसळलेली कणीक खाऊ घाला. असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्य-कर्म उदय होतील. हेच पुर्ण्य कर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील.  
 
* या दिवशी कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी सकाळी स्नानादी करून चांदीने निर्मित नाग नागिनची पूजा केली पाहिजे. पांढरे फुलांसोबत याला वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या. कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात अचूक उपाय आहे.   
 
* ज्यांना कालसर्प दोष असेल, त्या व्यक्तींनी अामावस्याच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राम्हणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे.  
 
* अमावस्याच्या रात्री 5 लाल फूल आणि 5 जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धन प्राप्तीचे प्रबळ योग बनतात.  
 
* अमावस्याच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने ती खालली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होतील.  
 
* या दिवशी दारू इत्यादी मादक पदार्थांचे सेवन नाही केले पाहिजे.  
 
* अमावस्याच्या दिवशी भुकेले प्राण्यांना भोजन करवण्याचे विशेष महत्त्व आहे.