गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

मंगळ भारी असेल तर या मंगळवारी करा हा उपास, दूर होईल आर्थिक तंगी

गणपतीला प्रथम पूजनीय देव मानले जाते आणि प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थीचा उपास केला जातो. जेव्हा हा उपास मंगळवारी येतो तर त्याला  अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार ज्याच्या पत्रिकेत मंगलदोष असेल त्याला हा उपास नक्कीच करायला पाहिजे. या दिवशी गणपतीची विशेष पूजा केली पाहिजे, ज्याने मंगल दोषाची शांती होऊन मंगल दोष दूर होण्यास मदत मिळते. 

गणपतीला सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. ज्या व्यक्तीला धन संपत्ती प्राप्त करण्याची इच्छा असेल त्यांनी गणपतीच्या 12 नावांचा पाठ करायला पाहिजे. यामुळे पत्रिकेतील मंगल दोष शांत होतो.  
एखाद्या शुभ कार्यांची सुरुवात करण्याअगोदर गणपतीची पूजा केली जाते. म्हणून या दिवशी सकाळी अंघोळ करून विधिवत गणपतीची पूजा करायला पाहिजे, ज्याने कुंडलीत मंगल दोष लागत नाही.   
 
या दिवशी गणपतीची कृपा मिळवण्यासाठी त्यांना 11 किंवा 21 दूर्वा वाहायला पाहिजे आणि मोदकाचा नैवेद्य दाखवायला पाहिजे.  
 
मंगळवारी मारुतीचा दिवस असल्यामुळे या दिवशी गणपती पूजे सोबत मारुतीची पूजा देखील करायला पाहिजे. असे केल्याने दोघांचे आशीर्वाद प्राप्त होतात.