बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (06:53 IST)

वैजयंती माळ: विष्णू उपासनेसाठी सर्वश्रेष्ठ, जाणून घ्या 6 लाभ

वैजयंतीच्या वृक्षावर खूपच सुंदर फुलं उमगलतात. हे फुलं सुवासिक तसेच सुंदरही असतात. यांच्या बियांपासून माळ तयार केली जाते. वैजयंतीचे फुलं श्रीकृष्ण आणि विष्णू तसेच देवी लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे. हिंदू धर्म मान्यतेनुसार ही वैजयंतीची माळ धारण केल्याने आकर्षण वाढतं, मान- सन्मानात वृद्धी होते आणि प्रत्येक कार्यात यश प्राप्ती होते. तसेच अभ्यासात मन लागून विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळतं. मन शांत व स्थिर राहतं. शनि दोष कमी होण्यास मदत होते आणि इतर ग्रहांचा कुप्रभाव नाहीसा होतो.
 
वैजयंती एक सौभाग्यशाली वृक्ष आहे म्हणून याची माळ घातल्याने सौभाग्यात वृद्धी होते. ही माळ सोमवार किंवा शुक्रवारी सिद्ध करुन घालावी. माळ सिद्ध करण्यासाठी माळ एका ताम्हणात घ्यावी. त्यावर कच्चं दूध अथवा गंगाजल शिंपडावे, फुले व्हावीत. प्रतिष्ठापना करुन विष्णूंचे ध्यान करावे आणि मग धारण करावी.
 
वैयंतीच्या बियांच्या माळीने विष्णू किंवा सूर्यदेवाची उपासना केल्याने ग्रह नक्षत्रांचा प्रभाव नाहीसा होतो. विशेष करुन शनि दोष नाहीसा होतो. ही माळ धारण केल्याने देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते.
 
वैजयंती माळ धारण केल्याने किंवा या माळीने दररोज इष्टांचे जप केल्याने नवीन शक्तीचा संचार होतो आणि आत्मविश्वास वाढतो.
 
पुष्य नक्षत्रात वैजयंती माळ धारण करणे श्रेष्ठ असल्याचे म्हटले जातं. याने सर्व प्रकाराच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते.
 
वैजयंती माळने 'ऊं नमः भगवते वासुदेवाय' मंत्राचा नियमित जप केल्याने विवाहात येत असलेल्या अडचणी दूर होतात. सोबतच केळ्याच्या झाडाचे पूजन केल्याने लवकरच विवाह संपन्न होतो.