सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (06:56 IST)

बुध अष्टमी व्रत कथा आणि महत्व

अनेक ठिकाणी बुध अष्टमीच्या महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी श्री विष्णू भगवान आणि श्री गणेशाची पूजा करण्याचे देखील विधान आहे. 
 
या दिवशी घर स्वच्छ आणि पवित्र ठेवावे आणि इष्ट देवाची पूजा करावी. शास्त्रांप्रमाणे बुध अष्टमीच्या दिवशी देवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मकता आणि शुभता येते.
 
बुधाष्टमी कथा वैवस्वत मनु याशी संबंधित असल्याचे सांगितले आहे. यानुसार मनुचे दहा पुत्र आणि एक पुत्री इला होती. इला नंतर पुरुष झाली होती. इलाच्या पुरुष होण्यामागील कहाणी या प्रकारे आहे की मनु यांनी पुत्र कामना करत मित्रावरुण नावाचं यज्ञ केलं. त्या प्रभावाने त्यांना पुत्री प्राप्ती झाली. कन्येचं नाव इला असे ठेवले गेले.
 
इला हिला मित्रावरुण यांनी आपल्या कुळाची कन्या आणि मनुचा पुत्र होण्याचे वर दिले होते. एकदा राजा इल शिकार करत असताना अशा ठिकाणी जाऊन पोहचले जेथे महादेव-पावर्तीचे वरदान होते की या स्थानी प्रवेश करणारा स्त्री रुप धारण करेल. त्या प्रभावाने इलने प्रवेश केल्यावर तो स्त्री रुपात परिवर्तित झाला. 
 
इलाचे सौंदर्य बघून बुध प्रभावित झाले आणि त्यांनी इलाशी विवाह केला. इला आणि बुध यांचा विवाह सोहळाच्या रुपात बुधाष्टमी साजरी करण्याची परंपरा आहे.