1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 19 डिसेंबर 2020 (10:05 IST)

अजिंक्य राहण्यासाठी चाणक्यच्या या गोष्टी लक्षात ठेवा

चाणक्यांना मुत्सद्देगिरी आणि राजकारणाची खूप चांगली माहिती होती. त्यांनी आपल्या बुद्धी आणि धोरणाच्या बळावर चंद्रगुप्ताला शासक बनविले. चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितींचा सामना केला आहे. तरीही आपल्या आत्मविश्वासाला ढासळू दिले नाही. चाणक्याने आपल्या शत्रूंवर विजय मिळवून इतिहासाच्या प्रवाहाला नवे वळण दिले. चाणक्य नीतींमध्ये अत्यंत प्रभावी गोष्टींना नमूद केले आहे. ज्या मुळे आपण आपल्या शत्रूंवर विजय मिळवू शकता. 
 
* सामर्थ्यवान शत्रूंचा रणनीती बनवून सामना करावा -
चाणक्याच्या नीतीनुसार जेव्हा शत्रू आपल्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान असेल, तर त्यावेळी लपून बसावं आणि योग्य वेळ येण्याची वाट बघावी, त्या नंतर आपले स्वतःचे सामर्थ्य वाढविण्याकडे लक्ष द्यावे. आणि त्यावर काम केले पाहिजे. आपले हितचिंतक एकत्रित करून रणनीती बनवून त्यानुसार शत्रूंवर हल्ला करावा. ज्यामुळे आपण सहजच शत्रूंचा पराभव करू शकाल. चाणक्याची नीती सांगते जेव्हा शत्रू सामर्थ्यवान असतो तेव्हा शांततेने काम करण्याची वेळ असते.
 
* शत्रूंच्या क्रियाकलाप किंवा हालचालीकडे लक्ष द्यावे- 
चाणक्याच्या नुसार शत्रूंच्या प्रत्येक क्रियाकलापांकडे लक्ष राखून त्यांच्या  कमकुवतपणा जाणून घेऊन त्याला पराभूत केले जाऊ शकते. म्हणून शत्रूंच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवा आणि वेळ आल्यावर त्याला पराभूत करा.
 
* लपलेल्या शत्रूचा पराभव कसा करावा -
 प्रत्येक यशस्वी व्यक्तीचे शत्रू असतात. त्यापैकी आपल्याला काहीच शत्रू माहीत असतात तर काही अज्ञात शत्रू असतात. हे अज्ञात शत्रू आपल्याला थेट नुकसान न देता लपून हल्ला करतात.असे शत्रू खूपच घातक असतात. अशा शत्रूंचा शोध घेण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. अचानक झालेल्या हल्ल्याला न घाबरून जाता शत्रूच्या प्रत्येक हालचाली चा दृढपणे सामना करून त्याला लढा दिला पाहिजे.