सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (21:01 IST)

चाणक्य नीती : अशा स्त्रियांपासून नेहमी लांब राहावे

आचार्य चाणक्याने नीतिशास्त्रात जीवनाच्या विविध पैलू बद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या नीतीचे अनुसरणं करून आपण जीवनात येण्याऱ्या समस्यांपासून वाचू शकता आणि सुखी जीवन जगू शकता. चाणक्याने आपल्या नीतिशास्त्रात स्त्रियांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांच्या पासून नेहमी लांब राहावं अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या आहे या स्त्रिया ज्यांच्या पासून नेहमी लांब राहावं.
 
1 वाईट स्वभावाच्या स्त्रिया -
चाणक्यानुसार, वाईट स्वभावाच्या स्त्रियांपासून नेहमी लांब राहावं. अशा स्त्रिया आपल्या स्वार्थापायी वेळ आल्यावर आपला अपमान करण्यापासून देखील मागे होत नाही. अशी स्त्री आपल्याला आपत्तीमध्ये आणू शकते. म्हणून कधीही अशा स्त्री बरोबर राहू नये. अन्यथा आपल्याला  शारीरिक हानीसह सन्मानाची हानी सहन करावी लागू शकते.
 
2 कृतघ्न स्त्री -
चाणक्यानुसार जी स्त्री संस्कारी नाही तिच्या पासून लांबच राहावे. शारीरिक सौंदर्य काहीच काळाचे असत पण  मनाचे सौंदर्य आयुष्यभर राहतो. जर एखादी स्त्री शरीराने सुंदर नसून मनाने सुंदर आणि संस्कारी आहे तर अशा स्त्रीशी संबंध ठेवल्यानं व्यक्ती आपल्या आयुष्यात मान सन्मान मिळवतो परंतु एखाद्या कृतज्ञ स्त्रीशी संबंध ठेवल्यानं बदनामी होते.   
 
3 चरित्रहीन स्त्री - 
जी स्त्री एकापेक्षा अधिक पुरुषांशी संबंध ठेवते अशी स्त्री समाजात वेश्या मानली जाते, अशा स्त्री पासून लांबच राहावं. अशा स्त्रीच्या घरात जेवण करणे सुद्धा पाप मानले आहे.धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या आणि वाईट कामामध्ये असणाऱ्या स्त्रियांपासून लांब राहावं. अशा स्त्रियांमुळे समाजात अपमान सहन करावा लागतो. या व्यतिरिक्त आपण कोणत्या न कोणत्या अडचणीत येऊ शकता. म्हणून अशा स्त्रीला बघूनच तिथून निघून जावं, अन्यथा कोर्टाच्या फेऱ्यात अडकू शकता.
 
4 स्वार्थी आणि लोभी स्त्री -
जी स्त्री स्वार्थी आणि लोभी आहे जिच्या मनात नेहमी लोभ आहे अशा स्त्री पासून लांब राहण्यातच चांगले आहे. अशी स्त्री आपल्या लोभ आणि स्वार्थापायी लोकांशी संबंध ठेवते आणि काम पूर्ण झाल्यावर सोडून जाते. जो व्यक्ती अशा स्त्रीशी संबंध ठेवतो तो नेहमी खाली पडतो.