मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By

'मंगळग्रह' विषयी महिलांचा 'ग्रह' झाला दूर

मुंबईतील भाविकांनी अमळनेर येथील श्री मंगळग्रह देवाचे दर्शन घेतले
 
अमळनेर (जि. जळगाव, महाराष्ट्र)
मुंबई येथे विविध शासकीय विभागात कार्यरत असलेल्या महिला भाविकांनी जळगाव येथे एका धार्मिक कार्यकामानिमित्त जात असताना मंगळवारी श्री मंगळग्रह देवाचे दर्शन घेतले. यावेळी शनी व मंगळ ग्रहाविषयी मंदिराचे गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनंतर महिला भाविकांचा मंगळग्रह देवाविषयीचा गैरसमज दूर झाला.
 
श्री सतगुरु अनिरुद्ध बापू यांच्या कार्यक्रमासाठी मुंबई येथून शेकडो महिला व पुरुष भाविक निघाले आहेत. त्यापैकी काही महिला भाविक मंगळवारी सायंकाळी उशीरा मंंळग्रह देव मंदिरात दाखल झाल्या. मंदिरात आल्यानंतर पुरुष भाविकांनी श्री मंगळ देवाचे दर्शन घेतले. मात्र काही पौराणिक कथेत शनी देवाचे दर्शन महिलांनी घेऊ नये असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंगळ ग्रहाविषयी भिती व गैरसमज असल्याने अनेक महिला भाविक मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उभ्या होत्या.
 
महिलांमध्ये ग्रहाविषयी गैरसमज असल्याचा प्रकार श्री मंगळ मंदिराचे पुजारी प्रसाद भंडारी गुरुजी यांच्या लक्षात आला. त्यांंनी त्या माहिला भाविकांची भेट घेऊन विचारणा केली. भंडारी गुरुजींनी सांगितले की, देव आणि दानवाच्या युद्धात सरसेनापती म्हणून मंगळदेवाचे प्रमुख स्थान होते. त्यामुळे मंगळाचा प्रभाव मानवी जीवनावर देखील अनुभवायला मिळतो. नव ग्रहामध्ये मंगळ हा दानी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मनात कोणतीही भिती न बाळगता दर्शन घेण्याचे सांगितले. यावेळी मुंबई येथील वस्तु व सेवा कर विभागाच्या स्वाती मुंडके, मंदिराचे अध्यक्ष दिगंबर महाले, सुरेश बाविस्कर, जयश्री साबे आदी उपस्थितीत होते.