सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

घरातल्या गोष्टी कोणालाही सांगू नये, असे आम्ही नाही तर द्रौपदी सांगत आहे

महाभारतातील सर्वात सुंदर आणि रहस्यमय स्त्री म्हणजे द्रौपदी. पाच पती असूनही द्रौपदी जगातील सर्वोत्तम चरित्र आणि गुण असलेली स्त्री मानली गेली आहे. द्रौपदीने जगातील सगळ्या स्त्रियांना घेऊन 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे. चला तर मग जाणून घेऊ या कुठल्या आहे त्या गोष्टी.
 
1 स्त्रियांचे विचार समृद्ध असावे - द्रौपदीने सांगितले आहे की कधीही बायकांचे विचार कमकुवत नसावे. नाही तर घरात समृद्धी नांदत नाही. दोन्ही परिवाराला एक सारखी वागणूक दिली जायला हवी. समोरचा व्यक्ती चुकीचे वागत असताना सुद्धा आपण आपली वागणूक चांगली ठेवावी. आपल्या स्वभावात बदल आणू नये. काहीही झाले तरी आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करू नये.
 
2 एका चांगल्या आणि खऱ्या स्त्रीने वाईट स्त्रियांपासून लांब राहणे बरे - एका चांगल्या आणि खऱ्या स्त्रीने वाईट स्त्रियांपासून लांबच राहायला हवे. बाईला वाईट पुरुषांशीच नव्हे तर तर वाईट बायकांशी पण दूर राहायला हवे. वाईट बायका आपल्या वाईट वागणुकीमुळे दुसऱ्यांच्या घरालापण उद्ध्वस्त करून टाकतात.
 
3 एका स्त्रीसाठी तिचा नवरा सर्वस्व - द्रौपदीच्या म्हणण्यानुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये ढासळू नका. आपल्या नवर्‍याला नेहमीच साथ द्यावी. कारण लग्नानंतर तोच आपले सर्व काही असतो. नवराच नसला तर सगळं काही निरुपयोगी असतं. बायकोला हवे की आपल्या पतीला साथ आणि आदर द्यावे. तसेच त्यांच्या सर्व आज्ञा पाळल्या पाहिजेत. 
 
4 घरातील गोष्टी बाहेर पडू नये - स्त्रीला पाहिजे की आपल्या घरातील घडतं असलेल्या गोष्टींना बाहेरच्या कुठल्याही व्यक्तींना सांगू नये. असे केल्याने आपल्या घरातील खाजगी गोष्टी बाहेर पडू शकतात. अशावेळी त्यांचा फायदा शत्रू घेऊ शकतात. म्हणून कुणालाही आपल्या घरातील गोष्टी कधीही सांगू नये.