सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मे 2022 (15:14 IST)

तुळशीच्या पाच सेवा

basil leaves
अनेक घरात तुळशीचं रोप असतं. तुळशीची विशेष काळजी घ्यावी लागते अन्यथा हे रोपं लवकरच वाळून जातं. ते टिकवून ठेवण्यासाठी काही नियम आहेत, त्यातील 5 नियम जाणून घ्या. या नियमांचे अनुसरण केल्याने विष्णू आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होतील, तर सर्व देवी-देवतांनाही प्रसन्न करून आशीर्वाद मिळेल.
 
1. प्रथम सेवा : तुळशीच्या मुळांमध्ये, रविवार व एकादशी वगळता, दररोज योग्य प्रमाणात पाणी द्यावे. म्हणजे कमी नव्हे आणि जास्तही नव्हे. जर अधिक प्रमाणात पाणी दिले तर झाडं खराब होण्याची शक्यता वाढते. आपण एकादिवसाआड पाणी देतं असाल तरी योग्य ठरेल. पावसाळ्यात तर पाणी दोन दिवसानंतर दिलं तरी चालेल. रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुळस ठाकुरजींसाठी व्रत करते. या दोन्ही दिवस तुळस विश्राम करते.
 
2.द्वितीय सेवा : वेळोवेळी तुळशीच्या मांजरी तोडून तुळसपासून वेगळी करत राहावी अन्यथा तुळस आजारी पडून वाळून जाते. जोपर्यंत मंजरी तुळशीच्या शीशवर असते तोपर्यंत ती कष्टात राहते. तुळशीचे पानं, मंजरी तोडण्यापूर्वी किंवा तुळसला हात लावण्यापूर्वी तुळशीची आज्ञा घेणे आवश्यक आहे. रविवारी व एकादशीच्या दिवशी हे काम करु नये. नखांनी तुळस तोडू नये.
 
3. तिसरी सेवा: मासिक धर्मात असणार्‍या स्त्रियांनी तुळशीपासून लांब राहावे. अशात तुळस वाळण्याची शक्यता अधिक असते.
 
4. चवथी सेवा : तुळशी मातेभोवती कपडे वाळत घालू नये. ओल्या कपड्यांच्या सभोवताल साबण आणि पांढर्‍या प्रकारची कीटक किंवा जीवाणूंचा वास असतो, ज्यामुळे तुळशीला देखील कीटक लागू शकते. बहुतेक वेळा असे दिसून आले आहे की कपड्यांमुळे तुळशीत किड लागते आणि ती सडते, काळी पडते.
 
5. पाचवी सेवा : वातावरणाचा तुळसवर खूप प्रभाव पडतो. जास्त सर्दी किंवा उष्णतेमुळे तुळस खराब होते. म्हणून थंडीत तुळशीच्या सभोवती कापड किंवा काचेचे आच्छादन लावले जाऊ शकते. जोरदार पावसापासून तुळशीला वाचवावे.
टीप: तुळशीच्या झाडाची काळजी घ्या, तुळशीला हिरवीगार राहावी यासाठी माळीचा सल्लाही घेता येईल