मुख्यता: गुलाबाच्या फुलाचा रंग पांढरा, गुलाबी आणि लाल असतो. तसे तर आता निळी, काळे आणि इतर विविध रंगाचे गुलाबदेखील बाजारात दिसून येतात. पण गुलाबी रंगाचे फूल अधिक संख्येत मिळत असल्यामुळे याला
गुलाब म्हटलं जातं.
गुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके आपले जीवन सुखी करू शकतं हे बहुतेकच कोणालाही माहीत असेल. म्हणूनच पाहू या गुलाबाच्या फुलाचे काही सोपे टोटके:
मनोकामना पूर्तीसाठी: कोणत्याही शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारी ताजे 11 गुलाबाचे फुल हनुमानाच्या मूर्तीवर चढवावे. सलग 11 मंगळवार असे केल्याने आपली मनोकामना पूर्ण होईल.