testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

खूप काही शिकण्यासारखे पण सध्या विस्मरण झालेले

१ दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे.
धेनु मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची.
२. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. असे का ह्याचे उत्तरही तयार, म्हणायची, श्रीमंती देवापुढे कधीच नसते, दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची
घेवडा
भाजी
गुरुवारी करावी. घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.

३ अन्नाचे एक शीत तरी सैनिकासाठी पानात सुरवातीला बाजूला ठेवावे मग तुळशीत अर्पण करावे. देव त्यांना रोजचा घास पोहोचवतो, त्या लेकरांचे आयुष्य वाढते.


वाळवण घालताना आज्जी सूर्य मंत्र म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची.

५ रोज एकदा घरच्या झाडांना कुरवाळून यायची, कोरफडीचे पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे, तर म्हणायची, स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत. एखाद्याला फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये.

६.
मुंग्यांना साखर ठेवायची, म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा गं बायांनो, सुखात राहा,माझ्या लेकरांना डसू नका.

७ तुळशीला दिवा लावायची, चिलटे,किडे नष्ट होऊन घरात येत नाही.ती माझ्या घशाला अाराम देते मी
तुळशीच्या पानांना उब देते.

६ लाईट असूनही महिन्यातला एक दिवस रात्रीचे जेवण कंदील आणि चिमणी च्या उजेडात असावे आग्रह असे.
भाकरी पण चंद्रासारखी वाटते ,
सावल्यांची भीती जाते, खेळ करताना मौज असते, अंधाराची सवय असावी, भुमातेला पण शांतता मिळते म्हणायची.
७ दारातल्या रांगोळीने सरपटणारे प्राणी लांब राहतात. त्यांच्या कातडीला रांगोळी चिकटते म्हणायची.

८ झोपताना तांब्याच्या धातुतील तांब्या पाणी भरून डोक्याशी ठेवायची, चांगले असतेच पण तापलेल्या 'भु'चा तप्त असा भार किंवा स्पंदने
तांबे घेते आणि आपल्याला शांती देते.

अजब अशा गोष्टी आणि त्या मागचा अभ्यास, अनुभव आणि ज्ञान कधी लक्षातच घेतले नाही.


यावर अधिक वाचा :

मार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम

national news
शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...

जानवे घालण्याचे 9 फायदे

national news
जानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...

ख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे

national news
ख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...

जाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....

national news
तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...

नाताळ – एक अद्वितीय सण

national news
नाताळ अर्थात ख्रिसमस हा सण प्रभू येशू यांचा जन्मदिन म्हणून २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला ...

राशिभविष्य