सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 8 जून 2020 (06:44 IST)

चतुर्थी तिथीच्या मागील 8 रहस्य, जाणून घ्या प्रत्येक चतुर्थीचा प्रभाव

प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थ्या असतात. अश्याप्रकारे वर्ष भरात 24 चतुर्थ्या असतात. परंतु दर 3 वर्षाच्या नंतर अधिकाचा महिना येत असल्याने एकूण 26 चतुर्थ्या होतात. प्रत्येक चतुर्थीचे आप आपले महत्व आहे. चला तर मग या चतुर्थींचे 8 रहस्य जाणून घेउ या...
 
1 दोन विशेष चतुर्थी : चतुर्थी तिथीची दिशा नेऋत्य आहे. अवसेच्यानंतर आलेल्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हटले जातं आणि पौर्णिमे नंतरच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.
 
2 चतुर्थीचे इष्ट देव गणपती : गणपती हे शंकराचे पुत्र आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात.
 
3 विनायकी चतुर्थी : भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला गणपतींचा जन्म झाला होता. ह्याला विनायकी चतुर्थी असे ही म्हणतात. काही ठिकाणी वरद विनायक चतुर्थी आणि गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. सुख, सौभाग्य प्राप्तीसाठी या दिवशी गणेशाची पूजा करावी.
 
4 संकष्टी चतुर्थी : माघी महिन्यातील कृष्ण पक्षाला येणारी चतुर्थीला संकष्टी चतुर्थी, माघी चतुर्थी किंवा तिळकुटी चतुर्थी असे ही म्हणतात. बाराही महिन्यातील चतुर्थींपैकी ही चतुर्थी सर्वात मोठी आहे. चतुर्थीचे उपास केल्याने सर्व अडथळे दूर होऊन आर्थिक लाभ मिळतं.
 
5 निषिद्ध चतुर्थी : निषिद्ध चतुर्थी म्हणजेच रीती तिथी. ज्या तिथीला काही ही नसते ती रीती तिथी म्हटली जाते. त्या तिथीला काही ही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. 
 
6 शनिवारी चतुर्थी : गुरुवारी येणारी चतुर्थी मृत्यूची असते. शनिवारी येणारी चतुर्थी सिध्दिदात्रा असते. अश्या स्थितीमध्ये रीती तिथी आल्यास तो दोष संपतो. 
 
7 कृष्ण चतुर्थी मध्ये जन्मलेले मुलं : ज्योतिष शास्त्रानुसार चतुर्थीला 6 भागांमध्ये विभागले आहे. पहिल्या भागात जन्म झाल्यास शुभ असतं, दुसऱ्या भागात जन्म झाल्यास वडिलांसाठी नाशक, तृतीय भागात जन्म झाल्यास आई साठी नाशक, चौथ्या भागात जन्म झाल्यास मामासाठी नाशक, पाचव्या भागास जन्म झाल्यास कुटुंबाचा नाशक आणि सहाव्या भागास जन्म घेतल्यास संपत्तीचा किंवा स्वतःचा नाश होतो. 
 
8 जन्मदोष प्रतिबंध : या दोषाच्या निवारणासाठी गणपतीची पूजा करायला हवी. किंवा सोमवारचे उपास धरून शंकराची पूजा करायला हवी. प्रदोष करायला हवे. हनुमान चालीसाचे पठण करायला हवे. किंवा महामृत्युंजय मंत्राचा जाप केले पाहिजे. आपले घर दक्षिण मुखी असल्यास ते घर आपल्यासाठी फलदायी ठरतं नाही.