शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

अधिकमासात काय करावे

पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे.
आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग करावा.
अधिकमासात उपोषणाला विशेष महत्त्व आहे. एक वेळेसच अन्न ग्रहण करावे. जेवताना मौन पाळावे.
महिनाभर दररोज देवाजवळ दिवा लावावा आणि नंतर ब्राह्मणाला दान द्यावा.
या महिन्यातील दानाचे अत्यंत महत्त्व आहे. दररोज दान करावे. संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल, त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथी आणि व्यतिपात, वैधृती या योगांवर विशेष दानधर्म करावा.
या महिन्यात जावयाला एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात तेहतीसच्या पटीत अनारसे द्यावे. अनारशा ऐवजी इतर कोणतेही जाळीदार पदार्थ देऊ शकतात.
या महिन्यात नारळ, सुपार्‍या, फळे यासारख्या वस्तू सुद्धा तेहतीसच्या पटीत घेऊन दान करतात.
या महिन्यात पुरणाचे दिंड करून इष्ट मित्रांना, नातेवाइकांना भोजन करवावे.
रोज गायीला पुरण पोळीचा घास द्यावा.
महिनाभर सतत नामस्मरण करावे - यात कुलदैवताचे नामस्मरण सर्वश्रेष्ठ.
नारायण - श्रीकृष्णाचे स्मरण करावे.
अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्त्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला दान द्यावी. 
पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावी.
महिन्यातून निदान एक दिवस तरी गंगास्नान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
महिनाभर तांबूल दान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते.
महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते.
अधिकमासात नित्य कर्मे करावीत पण काम्य कर्मे करून नयेत.