Magh Purnima पवित्र नदीत स्नान करण्याचे महत्व, पद्म पुराणात सांगितलेली गोष्ट

Ganga Dussehra 2020
Ganga Snan 2020
Last Modified शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (15:23 IST)
माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्या संदर्भात माहिती पद्म पुराणातील एक कथेत सापडते. एकदा चुकीने प्रभू विष्णुंच्या पायाखाली एक विंचू आला. जसंच प्रभूंचा पाय त्या विंचवावर पडला त्यांने स्वत:च्या बचावासाठी श्रीहरीच्या पायाला दंश केले परंतू विंचूचा मृत्यू झाला. आपल्या पायाखाली आल्यामुळे जीव हत्या झाल्याचे दुख आणि त्या दंशामुळे होत असलेल्या अहसहनीय वेदनेमुळे विष्णुंचे मन विचलित झाले. त्यांना प्रश्न पडला की काय करावे. विंचूच्या दंशामुळे पसलेलं विष औषधांमुळे दूर झालं परंतू श्रीहरींना त्याच्या मृत्यूचा दुख सतावत होतं. ते स्वत:ला जीव हत्येचं दोषी समजतं होते. तेव्हा नारद तेथे आले आणि सर्व जाणून त्यांनी श्रीहरींना म्हटले की आपण पृथ्वीवर जाऊन पवित्र गंगेत माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान करावे, याने आपल्या मनातील सर्व वेदना दूर होतील आणि जीव हत्येचा पाप देखील नाहीसा होईल. नारदाचे ऐकून श्रीहरी वेष बदलून माघ पौर्णिमेला संगम तटावर स्नान करण्यासाठी पोहचले. तेथे त्यांनी स्नान केले आणि तटावर तपस्या करत असलेल्या ऋषी मुनींना दान-दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन दोष मुक्त झाले. नंतर या कथेचा प्रचार नारदजींच्या मुखातून झाला आणि गंगा इत्यादी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा सुरू झाली.
गंगा स्नान महत्व
माघ पौर्णिमेला स्वयं विष्णू कोणत्याही रुपात स्नान करण्यास येथे येतात असे मानले जाते. म्हणून या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी हरिद्वार, प्रयागराज आणि इतर ठिकाणी मेळे आयोजित केले जातात. या व्यतिरिक्त नर्मदा, यमुना, शिप्रा, गोदारी सह अनेक पवित्र नद्यांच्या काठी लाखो भाविका स्नान करतात. सोबतच दान-पुण्य देखील केलं जातं.

जवळपास नद्या नसल्यास काय करावे
माघ पौर्णिमेला परंपरेनुसार पवित्र नदीत स्नान करावे परंतू जवळपास ही सुविधा नसल्यास किंवा जाणे शक्य नसल्यास आपण आपल्या घरीच अंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचे पाणी मिसळू शकता. अंघोळीच्या पाण्यात पवित्र सप्त नद्यांच्या पाण्याचे आवाहन करुन त्यात गंगा जल मिसळून स्नान करु शकता.

आवाहन मंत्र :
गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती ।
नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन संनिधिं कुरु ।।
स्नान केल्यानंतर आपल्या सामर्थ्यानुसार गरीब, निशक्त, गरजू व्यक्तींना अन्न दान, वस्त्र दान, फळ दान करावे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात

गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात
भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. या ...

|| शरीरी वसे रामायण ||

|| शरीरी वसे रामायण ||
जाणतो ना कांही आपण शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ || आत्मा म्हणजे रामच केवळ, मन ...

रविवारी सूर्यला अर्घ्य द्यावे, मनोकामना पूर्ण होईल

रविवारी सूर्यला अर्घ्य द्यावे, मनोकामना पूर्ण होईल
सूर्य देवतेची पूजा केल्याचे अनके फायदे आहेत. याने जीवनात यश मिळतं, आत्मविश्वास वाढतो आणि ...

श्रीखंड बनवा झटपट सोप्या पद्धतीने

श्रीखंड बनवा झटपट सोप्या पद्धतीने
दही स्वच्छ पातळ कापडात लटकवून ठेवा. त्यातील पाणी निघून जाईल तोपर्यंत लटकवून ठेवा. (4 ते 5 ...

''शनी'' सर्व दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

''शनी'' सर्व दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र
ज्योतिष शास्त्रात शनीची चाल सर्वात धोक्याची मानली गेली आहे. शास्त्रांनुसार शनी देवाला ...

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग ...

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग व्हाट्सएप वापरत नाहीत! जाणून घ्या कोणता अॅप वापरतात ते
कोट्यवधी मोबाइल यूजर्स चॅटिंगसाठीव्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात, पण स्वतः व्हाट्सएपचा मालक ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या स्थानावर कायम
भारताची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना, वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी व अष्टपैलू दीप्ती ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे
ओटावा कॅनडामध्ये कोरोनाव्हायरसबद्दल एक नवीन चिंता निर्माण झाली आहे. आरोग्य आधिक्यांनी अशी ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना विनामूल्य Jio कॉलर ट्यून प्रदान करते. प्रीपेड किंवा ...

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!
आरोग्य दिनी सांभाळा, आरोग्य स्वतःचे, रक्षण करा, रोगराई पासून घरदाराचे, समाजाचे ही ...