मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जुलै 2018 (12:57 IST)

पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेस 14 जुलैपासून सुरुवात!

Jagannath temple in Puri
ओडिशात पुरी येथे जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाला शनिवारी सुरुवात होणार आहे. दरवर्षी आषाढ शुद्ध द्वितीयेला भगवान जगन्नाथ (श्रीकृष्ण), देवी सुभद्रा आणि बलभद्र या भावंडांची नवीन तयार केलेल्या भव्य रथांमधून यात्रा काढली जाते. जवळच्या गुंडीचा मंदिरापर्यंत हे रथ भक्तांकडून ओढून नेले जातात. नऊ दिवसांचा हा महोत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो लोक पुरी येतात. गुजरातमध्ये अहमदाबाद येथे तसेच देश-विदेशात अनेक ठिकाणी अशी रथयात्रा काढली जाते.