शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2020 (09:07 IST)

ग्रहण संपल्यानंतर यज्ञोपवीत/जानवे बदलावे का?

"सर्वेषामेव वर्णानां सूतकं राहुदर्शने ।" असे सांगितलेले आहे. अर्थात ग्रहणाचे  सूतक हे सर्व वर्णियांना असते.
त्याचप्रमाणे जानवे कधी बदलावे यासंबंधी पराशरांचे वचन पुढीलप्रमाणे आहे - "सूतकान्ते उपाकर्मे गते मासचतुष्टये । नवयज्ञोपवीतं तु धृत्वा जीर्णं विसर्जयेत् ।।" 
अर्थात सूतक संपल्यानंतर , उपाकर्माचेवेळी, चारमहिने वापरल्यानंतर जीर्ण यज्ञोपवीताचा त्याग करून नवीन यज्ञोपवीत धारण करावे असे सांगितलेले आहे. या वचनात सूतक संपल्यावर जानवे बदलावे असे सांगितलेले आहे व ग्रहणात सर्वांना सूतक प्राप्त होत असल्यामुळे ग्रहणानंतर जानवे बदलतात.