गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (06:20 IST)

कार्तिकी पौर्णिमेला धनप्राप्ती होण्यासाठी हे उपाय करावे

सनातन धर्मात महिन्याच्या शेवटच्या सणाचे म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेचे खूप महत्त्व आहे. हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. याच दिवशी महादेवाने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. या कारणास्तव, त्याला त्रिपुरी पौर्णिमा देखील म्हणतात. या प्रसंगी पवित्र नदीचे स्नान, दीपदान, देवाची पूजा, आरती, हवन आणि दान करण्याचे महत्त्व आहे.
 
या दिवशी गंगा स्नान केल्यावर आपल्याला विशेष फळाची प्राप्ती होते कारण या दिवशी आकाशातून अमृतवर्षाव होतो. या अमृताला मिळविण्यासाठी लाखो भाविक धर्म नगरीमध्ये स्नान घेण्यासाठी येतात. अफाट संपत्ती मिळविण्यासाठी हे अचूक उपाय करा -
 
* या दिवशी  घराला घाण होऊ देऊ नका आणि घराची स्वच्छता करा. असं केल्यानं घरात लक्ष्मी येते. आपल्या घराच्या दाराला देखील सजवा.
 
* घराच्या दारासमोर स्वस्तिक बनवा आणि भगवान विष्णू आणि आई लक्ष्मीची पूजा करा.
 
* कार्तिकी पौर्णिमेला चंद्रमा बघा आणि चंद्राला खडी साखर आणि खिरीचा नैवेद्य दाखवा.
 
* या दिवशी गऊ दान केल्यानं अनंत फळ प्राप्त होतात.
 
* या दिवशी दिवे दान केल्याचे देखील महत्त्व आहे. या मुळे घरातील सर्व त्रास दूर होतात आणि घरात सौख्य नांदते. जर आपण कोणत्या कारणास्तव नदीत दीपदान करू शकत नसाल तर जवळच्या एखाद्या मंदिरात जाऊन दीपदान करावे.
 
* तांदूळ, साखर आणि दुधाचे दान करणे किंवा थोडक्यातच प्रमाणात त्यांना नदीत वाहल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते.